18 July

मराठे , शक्तीचे प्रदर्शन करणार का वापर 

marathe what do , fight ya face
By भागवत तावरे
  • 479 View


आम्हाला पक्के लक्ष्यात आहे,  १६ जुलै २०१६ रोजी दैनिक लोकाशाने कोपर्डीची घटना पान एक वर मांडून  "पुरोगामी महाराष्ट्रात बलात्काराच्या विरोधातील चळवळीत दुजाभाव " या मथळ्याखाली जनतेला आंदोलनाचे आवाहन केले होते . त्याच्या दुसऱ्याच दिवशी  महाराष्ट्रातील सर्वात पाहिल्यांदा जनक्षोभ बीड मध्ये रस्त्यावर उतरला. त्यानंतर  ८ ऑगस्ट २०१६ हि तारीख एका ऐतिहासिक मोर्चा श्रुंखलेची नांदी ठरवत मराठा समाजाने  औरंगाबाद येथे तीन लाख लोकांना घेऊन क्रांतीचा निखारा टाकला अन पाहता पाहता क्रांतीचा वणवा राज्यभर पसरला . जेव्हा शंभर लोकांना एकत्रित आणणे जिकरीचे होते त्या काळात लाखांचे लोंडे महाराष्ट्राच्या रस्त्यावरून वाहू लागले . कोपर्डीच्या वेदेनेचा फुंकर घेऊन गेल्या दोन पिढ्याची वेदना भडकली , अबाल मराठा मावळ एकत्रित झाला, महिला ,पुरुष युवक  हक्कासाठी पेटून उठले , संख्येने एकत्रित आल्यावर प्रक्षोभ होण्याची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात मूक मोर्चे काढून मराठ्यांनी इतिहास घडवला . समाजातील प्रत्येक वर्गाने मराठ्यांचे कौतुक करत मागण्या मान्य करण्याबाबद क्रांतीची भाषा स्वीकारली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अण्णासाहेब पाटील जयंती दिवशी पोटतिडकीने मराठ्यांच्या पोटातली आग मान्य केली अन व्यक्त देखील . आरक्षण मिळवून घेऊ अस्या निर्वाणीच्या घोषणा केल्या . मात्र एका कोपर्डीचा निकाल न लावू शकणाऱ्या व्यवस्थेच्या उरावर रोज एक कोपर्डी घडत आहे . जर लाखोंचे मोर्चे काढून मूक भावना बहिऱ्या सरकारला कळणार नसतील तर संघर्षाचे विविध प्रकार आहेत त्यांचा अवलंब आम्ही करणार आहोत काय ? का मग फक्त शक्तीचे प्रदर्शन करून मुंबई पाहून परतणार आहोत याचे उत्तर मराठ्यांनी मिळवले पाहिजे.
         बहुसंख्याक समाज संख्येने एका छत्राखाली एकत्रित येईल असे इतिहासात फक्त अपवादाने घडलेले आहे . त्यात २०१६ हे वर्ष त्याची साक्ष देणारे ठरले . अंगावर दर्र्रर्र्र्र  काटा फुटावा अस्या संख्येने जणू विशाल गंगेचे रस्त्यावर अंथरले असा मराठ्यांचा महापूर आम्ही पाहितला . प्रत्येक जिल्ह्यातील निघालेली महाकाय मोर्चे पाहून मराठ्यांचा जखमा राज्याला अधोरेखित झाल्या . गरीब मराठ्यांचे दुख समजून घेतले पाहिजे असे मनोमन वाटणाऱ्या सत्ताधारी विरोधकांना वाटू लागले . मराठा क्रांती मोर्चा नावाने कुठल्याच नेतृत्व  शिवाय जनतेने स्वयंभू संख्येचा सर्प वाढवला मात्र तो पुढे कागदाचा ठरला . कारण आज मागे वळून पाहताना ५७ मोर्चाचा लेखा जोखा घ्यायचा म्हटला तर बेरीज शून्य येईल . वर्तमानपत्रांची पाने ते पाने भरून आली . मराठ्यांचा शिस्तबद्ध एल्गार मराठ्यांना सन्मान मिळवून गेला मात्र समस्या सोडवू शकला नाही हे वास्तव आज मान्य करायला हवे , कारण त्यानंतरच मुंबईत निघणाऱ्या मोर्चाचा सदुपयोग करून घेता येणार आहे . नेतृत्वहीन मोर्चा हा कौतुकाचा विषय नाही तर न मिळणाऱ्या यशाची शास्वती असते , हे आता ५७ मोर्चे काढून थंडावलेल्या मराठ्यांना वेगळे सांगायला नको . त्यामुळे मराठ्यांनी आता शक्ती चे प्रदर्शन करायचे का मनगट आवळायची अन संघर्षाचा स्वर आलाप अन पट्टी बदलायची हे ठरवून घ्यावे . सरकार ला ज्या भाषेत वेदना समजतात त्याच भाषेत आंदोलन करता येत नसेल तर तो आक्रोश वेळ अन काळ वाया घालत असतो हे मार्टिन ल्युथर चे वाक्य आहे . सामान्य मराठ्यांचा कुठला दोष होता काय जे सहभागी झाले , चूक झाली ती म्होरच्या थोपात , एकवटलेल्या शक्तीचा मोबदला मिळवण्यात त्यांना यश आले नाही , पेटलेल्या वणवा त्यांना दाखवता तर आला मात्र सरकारपर्यंत पोहोचवताना त्यांना यश आले नाही , यामुळे मंत्रालयात मराठ्यांचा आक्रोश पोहोचलाच नाही , याच वेळी राजकीय परिपक्व झालेले नागपूरचे फडणवीस यांनी गोड बोलून मराठे थंड केले . सरकारच्या गालीच्यावर राजाश्रय प्राप्त मराठे नेते तत्कालीन गर्दीचा भाग तर झाले मात्र मराठ्यांना दिलासा मिळवून देण्यात यशस्वी झाले नाहीत . म्हणूनच स्वयंभू मराठ्यांचा आखरी पाडाव ऑगस्ट ला मुंबईत पडत असताना,  मागचे पाढे पंचावन्न होऊ द्यायचे का शक्तीचा वापर करायचा हे ठरवले पाहिजे . मागे आ.विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे घेऊन जाण्याचे निश्चित केले होते त्यावर देखील मोर्च्याच्या पुढे असणाऱ्या मंडळीने गांभीर्य समजून घेतले पाहिजे . 
  कुठल्याची समाजाची गती, प्रगती अन अधोगती  हि तत्कालीन सामाजिक राजकीय नेतृत्वावर अवलंबून असते, हे कुणबी मराठ्यांना पंजाबराव देशमुखांनी दाखवून दिले आहे . असो आज मराठ्यासाठी एकच प्रश्न आहे एकवटणे त्यांच्यासाठी महत्वाचे नाही फक्त तुंब कुठे वळवायचा ठरवले पाहिजे . सरकारला ज्या भाषेत कळते त्या भाषेत बोलायला शिकले पाहिजे नाहीतर दुर्दैवाने ५७ ऐवजी ५८ एवढाच काय तो फरक पडेल , पोर मुंबई पाहून परत येतील , अठरा विश्व दारिद्र्य कायम असेल , गेलात जिंकून आलात तर आरसे पाहू शकताल . .. . . . . . . 
           
 शेतकरी संपाचा आदर्श घेणार का 
क्रांती मोर्चा मधील उपस्थिती पाहितली तर शेतकरी संप पाच टक्के देखील नव्हता . प्रत्येक जिल्ह्यात लाखोच्या घरात एल्गार असलेल्या ५७ मोर्च्यांनी जे साधले नाही ते नगर नाशिक मधल्या शेतकरी संपाने साधले अन त्याचा कमी अधिक का होईना लाभ राज्यात झाला . शेतकरी संप मराठी क्रांतीच्या तुलनेत कमालीचा अल्पवयीन होता मात्र त्याने साधलेल ध्येय मात्र कमी कष्टात साधले गेले . मराठ्यांचे लाखोचे मोर्चे रस्त्यावर आपला प्रक्षोभ दाखवत होते मात्र सरकार सोबत चर्चा कुणी करत नव्हते , अर्धे हळकुंड चर्चा करायची नाही म्हणून अडून बसली अन त्यातच सरकार गपगार राहिले , शेतकरी संपात मात्र आंदोलन सुरु होते तोच सुकाणू समिती गठीत करण्यात आली , आंदोलनाला थोडे गालबोट लागताच सरकार गुड्ग्यावर आले , सुकाणुच्या नुसत्या डरकाळ्यात जी आर च्या मागे जी आर मंत्रालयातून बाहेर पडले , हे काम मराठ्यांना का साधता आले नाही यावर खल होणे गरजेचे आहे काय , मूक भावनांना जरा बोलके केले पाहिजे काय , याचा विचार मराठ्यांनी ज्या त्या स्तरावर जावून केला पाहिजे . 

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king