10 July

हिटलर अभी जिंदा है 

hitlar is live
By भागवत तावरे
  • 662 View


मोदी- ट्रम्प -पुतीन किम जोंग 
निर्धास्त अन बिन्दास्त असलेल्या मानवाची झोप उडवणारे एक सत्य होकिंग्स ने गेल्या महिन्यात समोर आणले . " पृथ्वी १०० वर्षाची उरली असून पृथ्वीवासीयांनी आपल्या निवासासाठी दुसरा गृह बघावा" असे त्याचे म्हणणे आहे . आणखी एक त्यांचा विचार जाणून घेणे गरजेचे आहे त्यांचे स्पष्ट असे म्हणणे आहे कि वर्तमान परिस्थितीत इस्रायल यांच्याशी सलोखा म्हणजे अपराध आहे . आज पेलेस्तनी गाजा पट्ट्यावर जी बंबबारी इस्रायल करत आहे ती निंदनीय आहे . विशेष हे हम्म्मास या दहशतवादी संघटनेवर होत असलेला हा हल्ला मानवतेला शोभत नाही . अनेकांना विनोद वा चेष्टा वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र वातावरणातील २ डिग्री वाढलेले कार्बन त्या विध्वंसाची पूर्वकल्पना देण्यास सक्षम आहे . भौतिक प्रगतीचा चंग बांधलेले राष्ट्रप्रमुख ज्या प्रमाणे वागत आहेत त्यावरून जगाचा विनाश कुणी रोखू शकेल असे वाटत नाही . वाचकांना हे मान्य करणे कठीण होऊ शकेल मात्र गेल्या महिना भरातील अंतराष्ट्रीय घडामोडी लक्ष्यात घेता युद्धाला फक्त कारण हवे तयारी पूर्ण अशी परिस्थिती आहे .६० लाख यहुदिंना यमसदनी पाठवणारा अडोल्फ हिटलर जर्मनीत अंत पावला असला तरी तो थोडा अमेरिकेत ,थोडा उत्तर कोरियात ,काही रशियात अन जरासा भारतात देखील नुसता जिवंत नाही तर उतावळा आहे ,होलीकोस्ट करण्यासाठी .( होलीकोष्ट म्हणजे ज्यात लोक मारून जाळले गेले .)
        जहाल लोकप्रियता मिळवून व्यक्तीवलय वाढवले जात आहे . अखाती देशातील तेल जसे रशिया अमेरिकेला एकमेकासमोर आणत आहे, तद्वत राज्यातील एक नेता जेव्हा राष्ट्रीय धुरा सांभाळतो त्यावरून जगाचा परीघ त्याला खुणावत असेल तर तो काय करू शकतो याचे उदाहरण नरेंद्र मोदी ठरत आहे . मोदी यांचे विदेश दौरे पाहता त्यांना वैश्विक नेतृत्व करण्याची खुमखुमी असल्याचे स्पष्ट जाणवते यातून ते परस्पर विरोधक आणणारी राष्ट्रे अन त्याचे धोरणे बाजूला ठेवत आहेत काय आणि त्यासाठी ते भारतीय सुरक्षेला वेठीस धरत आहेत काय याचा देखील विचार झाला पाहिजे .  पृथ्वी नैसर्गिक अन मानवीय पातळीवर असुरक्षित झाली आहे . देशांतर्गत असलेल्या स्पर्धेने जगाला तिसऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आणून उभा केले आहे . लोकसंख्येच्या बळावर चीन चा द्र्गन जगाला गिळू पाहत असताना भारत त्याच्यावर अमेरिकेला घालू पाहत आहे त्यात ईशान्य कडील त्याचा पेच त्याला सोडवायचा आहे . भूतान च्या कळेवर भारत चीन च्या भाई भाई ची तिलांजली जाणार आहे . तिकडे दक्षिण चीन सागरावर अमेरिकेने आपले लढाऊ विमाने फिरवले आहेत , अखाती पट्ट्यात सिरियात असणारा दहशत वाद थेट युरोपच्या मानगुटीवर जावून बसला आहे . पाकिस्तान भारत दरम्यान असणारा काश्मीर प्रश्न धर्माधीष्टीत झाल्याने येणाऱ्या काळात यावरून मुस्लीम राष्ट्रांना एकत्रित करून भारताला धडा शिकवण्याची संधी चीन सोडेल का,  हि शंका आहे . 
 डोनाल्ड नावाचा निव्वळ निर्धास्त माणूस तिकडे अमिरिकेत सत्तेत असल्याने त्याला कुणाची तमा नाही , स्वतच्या मुलीत कमनीय बांधा शोधणारा अन मिडियाला कौडीचा भाव न देणारा रमता जोगी थेट मुस्लीम तिरस्कार करत जगात मुस्लिमांना खिजवत आहे . चीन अमेरिकेला गिळण्यास गेली ४० वर्षे आतुर आहे . त्या दुश्मनीत डोनाल्ड तात्या भारताचा बळी घेतील , चीनच्या  कमरेखाली काड्या करण्यासाठी भारताचा वापर तो गोल तोंडाचा माणूस करणार असेल अन त्यातून चीनी सर्प पाकिस्तानचा रुस्तुम म्हणून भारताच्या अंगावर फना काढणार असेल तर मात्र आम्हाला ते परवडणार नाही . याचा विचार मोदी करणार आहेत का ? इस्रायल च्या समुद्राचे पाणी पिताना इकडे त्यांचे संरक्षणमंत्री चीन ला १९६२ ची आठवण करून देण्याइतपत मुजोर झालेले आहेत . दैनदिन आयुष्यात भारतातील ६० टक्के लोक कष्टात असताना नरेंद्र मोदी देशासमोर कसला पेच आणतील हे राम जाने . इस्रायल च्या तीन दिवसीय दहशत वाद संपवण्यासाठी मित्र मिळवले जात होते का शत्रू हेच येणाऱ्या काळात पहावे लागणार आहे . पेलास्तिनी अन चीन सोबतचे वितुष्ट भारताला भविष्यात किती फायद्याचे ठरणार यावर मात्र कुणी बोलताना दिसत नाही . 
पुनीत नावाचा माणूस तेलावरून अमिरेकेसोबत कुस्ती खेळण्यासाठी तत्पर असतो त्यावरून अमेरिकेचे मित्र अन शत्रू ठरतात , भारताची सर्वात मोठी डोकेदुखी पाकिस्तानच्या कुरुबुरीचा बंदोबस्त करण्यासाठी जर आम्हाला काही मित्र मिळवायचे असतील तर आपण पाकिस्तान ला देखील असे मित्र मिळवून देत आहोत काय यावर मोदी लक्ष देत नसावेत . जग अत्यंत तणावाखाली वावरत असताना दुसर्या बाजूने वातावरणात होणारे बदल देखील लक्ष्यात घेण्यासारखे आहेत. 
उत्तर कोरिया मधील किम जोंग नावाचा लहरी तानाशहा एक जगाचा केंद्र बनला आहे पूर्ण जगाला वेठीस धरणारा तो कुठल्याही परिस्थितीत विध्वंसक पावूल उचलेले सांगता येत नाही . या धर्तीवर शांततेसाठी अन पर्यावरण संवर्धन साठी प्रयत्न केले पाहिजेत . नाहीतर होकिंग्स च्या भाषेत आपले आटोपले आहे . 
.पाकिस्तानने भारतावर अशाप्रकारचा हल्ला केला, असे गृहीत धरल्यास सध्या पाकिस्तानकडे असणाऱ्या सर्वोच्च क्षमतेच्या अणुबॉम्बची क्षमता ४५ किलोटन इतकी आहे. या अणुबॉम्बमध्ये २८० मीटरचा परिसर बेचिराख करण्याची क्षमता असून, जमिनीवर या बॉम्बच्या स्फोटामुळे १.१६ किलोमीटरच्या परिसरात किरणोत्साराचे दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात. समजा, या अणुबॉम्बचा स्फोट हवेत झाला, तर जवळपास २.५ किलोमीटरच्या कक्षेतील परिसरावर त्याचा परिणाम होईल आणि ३.०५ किलोमीटरच्या कक्षेतील लोकांना गंभीर इजा होऊ शकते. याउलट, भारताने स्वत:जवळ असणाऱा ६० किलोटन क्षमतेचा अणुबॉम्ब पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर टाकल्यास संबंधित शहरातील ३१० मीटरचा परिसर बेचिराख होईल. तर, १.१६ किलोमीटरच्या परिसरात या स्फोटामुळे किरणोत्साराचे दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात. समजा, हा स्फोट हवेत झाला तर पाकिस्तानी शहरांमधील २.७५ किलोमीटरचा प्रदेश बेचिराख होईल आणि ३.४८ किलोमीटरच्या परिसरातील लोकांना गंभीर स्वरूपाची इजा होईल.

कार्बन वाढले 
पृथ्वीच्या वातावरणात ७८% नायट्रोजन वायू व २१% ऑक्सिजन आहे. उरलेल्या १% मध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अरगॉन, निऑन, हेलियम, क्रिप्टॉन व हायड्रोजन वायू आहेत.यापैकी कार्बन डायऑक्साईड, मिथेन तसेच औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण झालेल्या नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लुरोकार्बन वायूंमुळे पृथ्वीचे तापमान उबदार राहते. औद्योगिक क्रांतीनंतर उभे राहिलेले औष्णिक व जलविद्युत प्रकल्प, प्रचंड जंगलतोड, लाकडाचे ज्वलन, जीवाष्म इंधन ज्वलनावर आधारित वाहतूक व्यवस्था, रासायनिक खतांचा बेसुमार वापर, वाढती शहरे आणि शहरांना करावा लागणारा नैसर्गिक संसाधनांचा अमर्याद पुरवठा, अविघटशील कच-याची प्रचंड प्रमाणात झालेली वाढ यामुळे कार्बन डायऑक्साईड, मिथेन व नायट्रस ऑक्साईड या उष्माग्राही वायूंचे वातावरणातील प्रमाण वाढले.
अणुबॉम्ब आणि आम्ही 
जगातील पहिल्या अणुबॉम्बची चाचणी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात १६ जुलै १९४५ रोजी घेतली. या मोहिमेचे नाव ट्रिनिटी असे होते. त्याच्यासोबत बनवलेले आणखी दोन बॉम्ब ‘लिटल बॉय’ आणि ‘फॅट मॅन’ म्हणून ओळखले जातात आणि ते ६ ऑगस्ट १९४५ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकण्यात आले.  सोव्हिएत युनियनने २९ ऑगस्ट १९४९ रोजी त्यांच्या पहिल्या अणुबॉम्बचा स्फोट घडवला.  अमेरिकेने १ नोव्हेंबर १९५२ रोजी पहिला हायड्रोजन बॉम्बस्फोट घडवला. तर सोव्हिएत युनियनने १२ ऑगस्ट १९५३ रोजी पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली. त्यानंतर अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन हे देश प्रमुख अण्वस्त्रधारी देश म्हणून उदयास आले आणि त्यांच्याकडील अण्वस्त्र भांडारात हजारो बॉम्ब आहेत. त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि इस्रायल यांनीही ही क्षमता मिळवली. नुकत्याच यशस्वीरीत्या केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीनंतर आता उत्तर कोरिया हा देश ह्यात सहभागी झाला आहे. 

मोदी तर राज्याचे नेते 
परराष्ट्र धोरण हा स्वतंत्र विषय आहे , नरेंद्र मोदी हे गुजराती पंतप्रधान आहेत हे बराक ओबामा यांनी केम छे असे विचारून पूर्वीच सिद्ध केले आहे . कॉंग्रेस विरोधी संतापी लाटेवर स्वार होऊन नरेंद्र मोदी दिल्लीच्या तक्थावर तर बसलेच मात्र देशात फारसा विरोध नसल्याने त्यांच्या नजरेत आता वैश्विक ओळख तयार करण्याची घाई आहे . त्यास विरोध नाही मात्र त्यासाठी सवासो करोड च्या देशाच्या भविष्याचे भांडवल करावे काय  हा प्रश्न आहे . राज्य चालवण्याचा उत्तम अनुभव असलेले मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून जागतिक मंचावर गेले त्यात गैर नाही मात्र आंतरिक कामना पुऱ्या करण्यासाठी ते देशाचे भाग्य वेठीस धरू शकणार नाहीत . सुषमा स्वराज या परराष्ट्रमंत्री आहेत मात्र त्यांना बाजूला करत मोदींचा गोंगाट कमालीची उंचावला आहे .
.............................................

चीन भारत २०१७ 
भारत १.३ दश लक्ष सैनिक 
चीन २.३ दश लक्ष सैनिक 
रणगाडे 
भारत ३९०० 
चीन ९१५० 
शस्त्रयुक्त वाहने 
भारत ६५००
चीन ४६००
स्वयचलित बंदुका 
भारत २९०
चीन १७१० 
रॉकेट लोन्चर 
भारत ३०० 
चीन १७७० 
एयर फायटर्स 
भारत ३७० 
चीन ६६२
ग्राउंड फायटर्स 
भारत २५८ 
चीन १११५ 
ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट 
भारत २४० 
चीन ७८२ 
हेलिकॉप्टर 
भारत ६३०+ 
चीन १०७२ +
डीस्टायर्स 
भारत १० 
चीन २६ 
लढाऊ जहाज 
भारत ४० 
चीन ७२ 
पान बुड्या 
भारत १५ 
चीन ६८ 
ऑटर क्राफ्ट 
भारत ८७ 
चीन ४५० 
स्टेटजीक मिसाईल 
भारत ५४ 
चीन शेकडो 
न्यू क्लियर 
भारत १०० 
चीन २६० 
एयर क्राफ्ट करिअर 



 

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king