21 July

  पंकजा मुंडे आणि राजीनामा  छे छे

pankja munde cant do that
By भागवत तावरे
  • 1208 View

 

मे वाल्या महाराष्ट्राचे अन त्यापूर्वीच्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आपण नावाने ओळखत असाल मात्र त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचे सर्वच पदर आजच्या राजकीय पिढीला ठाऊक असतीलच असे नाही . गांधी नेहरूंच्या प्रेरेणेतून पूर्ण झपाटून गेलेला हा माणूस दोन दोन महिने घरावर यायचा नाही , आपल्या बॅंकेच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे आपली पत्नी वेणूताई यांना परदेश दौऱ्यावर इच्छा असतानाही  घेऊन जाता आले नव्हते . वेणूताई ला यशवंतरावांनी लग्नापूर्वीच विचारले होते " सामाजिक जीवन सतीचे वान असते नेहमी प्रश्न आरोप अन त्याची जबाबदारी घेताना न केलेल्या गुन्ह्याची देखील शिक्षा भोगावी लागते , तेव्हा तक्रार करू नको की पती चांगला नाही "  उदाहरण फक्त एवढ्यासाठी की सामाजिक जीवन जगताना काचेच्या भांडयासारखे समजून जगावे लागेत त्यात आम्हाला हट्ट नाही धरता येत , जेव्हा समूहावर आपला प्रभाव असल्याचा स्वाभिमान नेतृत्वाला असतो त्याच वेळी समूहाचा विश्वास अन विकास साधला जावा असे काम नेतृत्वाने करावे असा नियम असतो . जेव्हा तुम्ही त्यात यशस्वी होता तेव्हा कौतुक मिळते अन तद्वत अपयश आले तर त्याची नैतिक जबाबदारी देखील घ्यावी लागते . मात्र वारसाने सत्ता मिळालेल्या पंकजा मुंडे मात्र हा महाराष्ट्राचा वारसा आठवणीत ठेवतील का असा पेच आहे . त्यांच्या बीड जिल्यात तब्बल ८०६ बालक कुपोषित आहेत पैकी १६० मृत्युच्या दारेत आहेत , जिल्ह्यात कुपोषित बालकाचे मृत्यू प्रमाण टक्के १४.६१% आहे . जुलै २०१६ ते जून २०१७ दरम्यान १९४ कुपोषित बालके दगावल्याची धक्कादायक माहिती आहे . त्यांच्यावर झालेल्या चिक्की वा इतर आरोपावर मला बोलायचे नाही मात्र स्वतच्या खात्यात अन जिल्ह्यात त्यांचे कामाचे अंकेक्षण केले पाहिजे . त्या कुणावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना तडीपार करतात या चर्चेत देखील मला पडायचे नाही वा मला त्यावर त्यांनी राजीनामा द्यावा असे देखील म्हणायचे नाही ,मात्र नैतिक जबाबदारी तरी स्वीकारली पाहिजे. स्वतच्या जिल्ह्यात शेकडोच्या संख्येत बालक दगावली जात असतील तर त्यांचे महिला व बाल कल्याण खाते नेमके काय करत आहे याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे . जलस्वराज्य हि योजना मागच्या सरकारची नाव बदलून वापरलेली योजना आहे असे मला म्हणायचे नाही मात्र त्या योजनेचे यश जसे पंकजा मुंडे स्वतच्या नावे करून घेतात तद्वत त्यांच्या खात्यातील हे अपयश त्या किमान मान्य करतील का ? हा सहज प्रश्न निर्माण होतो . दिल्लीत जलस्वराज चा बोलबाला वर्तमानपत्रात येऊ शकतो तर मग त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या खात्याची वाताहत कशी नाकारली जाऊ शकेल . त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा असे नाही मात्र किमान ती जबाबदारी घ्यावी , सुस्तावलेल्या यंत्रणा गतिमान कराव्यात , आरोग्य समितीच्या बैठकी होणार नसतील तर ते अपयश कुणाचे आहे हे सांगावे . 
              पंकजा मुंडे यांना पारंपारिक पद्धतीने राजकारण करायचे नाही , विकासाची भाषा बोलणाऱ्या पंकजा मुंडे नेमक्या विकासाच्या  मुद्द्यावर पिछाडीवर आहेत काय ? असा प्रश्न आहे .  परळी येथील विद्युत केंद्र बंद करणेबाबद अहवाल जात आहेत काय ? यावर देखील बोलले पाहिजे . उसन्या अवसनावर आणलेली जिल्हा परिषद मधील सत्ता कशासाठी आपण मिळवली अन त्यातून काय साधले याचे उत्तर देखील बीडवासियांना द्यावी लागणार आहेत .
बीड जिल्ह्यातील जिल्हा सरकारी दवाखान्याचे सी.एस.डॉ नागेश चव्हाण आणि पंकजा मुंडे यांचे भाजप कार्यकर्ते यांच्यात बेबनाव आहे त्यात कुठला "अर्थ" दडला आहे ,त्यांचे त्यांनाच ठाऊक ? मात्र यात जिल्ह्यातील आरोग्य सेवा पूर्ण ढेपाळली आहे . पालकमंत्री म्हणून त्यांचे कर्तव्य देखील तपासले पाहिजे . वर्तमान पत्राच्या दट्ट्याने पंकजा मुंडे यांनी तेथील समितीची बैठक घ्यावी अन त्यात ८०६ कुपोषित बालकावर जुजबी गांभीर्य बालविकास मंत्र्याने दाखवावे म्हणजे शोकांतिका म्हणावी लागेल . अन ती बैठक देखील कमालीची उशिरा ठरलेल्या वेळेनुसार , आता यातून त्यांना जिल्ह्याच्या आरोग्याचे किती गांभीर्य आहे हे तपासून घेतले पाहिजे , धनंजय मुंडे देखील त्यांच्या बहिणीचा राजीनामा मागत नाहीत कारण त्यांना सोयरे दुखवायची नसतील मात्र त्यांना हे देखील माहित असावे कि त्यांच्या पक्षाचे आर.आर.पाटील अत्यंत चांगली अन गाजवणारी कारकीर्द पार पाडत असताना एका छोट्या वाक्यामुळे तासगाव मुक्कामी धाडले गेले होते . 
       पंकजा मुंडे या राजीनामा देण्याइतपत कुठल्या समस्येला जबाबदार नसतील ? वडिलोपार्जित पुण्याईतून  मिळालेली सत्ता  पंकजांना सोडायची नसेल तर त्यांनी ती सोडू नये मात्र जबाबदारी स्वीकारली पाहिजे . काही प्रश्नावर हेलिकॉप्टर मध्ये त्यांचा राजीनामा तयार असतो , जेव्हा खातेपालट होऊ घातली जाते तेव्हा त्यांचा राजीनामा तयार असतो . मात्र त्यांच्या खात्याच्या अखत्यारीत घडणारे  लज्जास्पद विदारक सत्य समोर येते तेव्हा त्यांनी राजीनामा देणे राजकीय इतिहासाला साजेसे राहील . मात्र तो मला मागायचा नाही कारण तो भाग नैतिक परिघात येतो . 
              विलासराव देशमुख यांना फक्त एक दिग्दर्शक सोबत घेतला म्हणून राजीनामा द्यावा लागला , अजित पवार यांनी श्वेतपत्रिका काढली कि राजीनामा दिला , चाकुरकरांचा दोष फक्त पोशाख बदलायचा होता त्यांनी केंद्रीय गृहमंत्री पद सोडले . माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे नाव सिमेंट घोटाळ्यात आले तर राजीनामा , माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर एम बी बी एस परीक्षेत मुलीचे दोन गुण वाढवल्याचा आरोप झाला कि त्यांचा राजीनामा दिल्लीने घेतला होता , अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श चे आरोप झाले कि त्यांचा राजीनामा , दाऊदचे  कथित फोन प्रकरण, गजानन पाटील लाच प्रकरण, भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरण गाजत असताना खडसे यांना राजीनामा चुकला नाही , युतीच्या यापूर्वीच्या सत्ताकाळात जेव्हा अण्णा हजारे यांनी आरोप केले तेव्हा महादेव शिवणकर , शशिकांत सुतार यांना राजीनामा चुकला नाही ,
वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चुलती शोभाताई फडणवीस यांना देखील दाल घोटाळ्यातील आरोपावर सरकार मधून बाहेर पडावे लागलेले आहे . बबन घोलप यांनी देखील राजीनामा दिला होता . अशी नैतिक जबाबदारी स्वीकारलेल्या अनेकांची यादी पंकजा मुंडे यांच्या समोर मांडता येईल मात्र निर्णय हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे . 
          जिल्ह्यातील कार्यकर्त्यात असणारे सख्य देखील स्वतंत्र खलाचा विषय होऊ शकेल . जिल्हापरिषद मध्ये उसन्या अवसानावर आलेली सत्ता अन सत्ताधारी विजयाकडे  ना.पंकजा यांचे लक्ष किती यावर देखील खल केला पाहिजे . चक्क महिला व बालविकास खात्यातील तालुका स्तर सी डी पी वो च्या बदलीत परस्पर अर्थपूर्ण खेळ होत आहेत . तेथील कैकाडी समाजाच्या जाधव महिलेवर अन्यायकारक रित्या तांदळे या महिलेची निवड केल्याची चर्चा त्यांनी मिळवलेल्या जिल्हा परिषद आवारात होताना दिसत आहे .
         
टीप - व्यक्तीनिष्ठ अन तत्ववितुष्ट लोकांनी सदरील लेख दुर्लक्षित करावा . सत्तेसमोर प्रश्न उपस्थित करणे हा सवैधानिक हक्क आहे . 
 

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king