30 November
चौथऱ्यावरची महिला  आणि 
Women and cautharyavaraci
By भागवत तावरे
  • 2278 View

...चौथऱ्यावरची महिला  आणि ..
       काल एका व्रतवाहिनीच्या  कोटवाल्या  निवेदकाची घसा ताणून बातमी ऐकली एखादी मोठी समस्या निर्वतली अश्या अविर्भावात तो निवेदक सांगत होता कि अनेक वर्षाच्या पाशातून बाहेर येत महिलेने शनीच्या चौथऱ्यावर  जावून दर्शन घेतले . म्हणजे परंपरावादी आणि मर्यादा असणार्या समाज सीमा ओलांडल्या म्हणून चौथऱ्याभोवती असणाऱ्या रांगेतून या महिलेने वाट काढीत थेट चौथऱ्यावर चढून तिने शनीच्या मूर्तीच्या जवळ जाऊन दर्शन घेतलं.महिलेने चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्यामुळे शिंगणापुरात चांगलाच गदारोळ माजला. मात्र, तिचं हे दर्शन घेणं हे म्हणजे एका क्रांतीची नांदी आहे , असेही कुणी म्हणेल . . ती बदलाची नांदी म्हणून ठीक आहे .

      चला इथपर्यंत मान्य करूया कि त्या महिलेने मोठे कार्य केले आता त्या महिलेने अथवा किवा तिचे समर्थन करणार्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे कि पुढे काय ? भारतात  या गोष्टीला मोठी किंमत असते जे कधी केलेले नाही म्हणजे त्या महिलेने केलेल्या कर्त्याचा आणि सामाजिक उत्कर्षाचा काही संबंद असता तर , एकीकडे अगदी पुराण काळात देखील जेवढे महिला अत्याचार होत नसत त्यपेक्षा अधिक महिलावर अत्याचार होतात त्याचे कुणास वावडे नसावे किवा कुठल्या महिलेस त्यासाठी काय करावे हे सुचू नये का ? महिलांनी शनी देवाचे दर्शन घेऊ नये असा काही नियम नाही फक्त ते काही अंतरावरून घ्यावे असा नियम आहे तो पाळावाच असेही मी म्हणत नाही मात्र महिला शनीच्या भक्त येवढ्या भाऊक झाल्या कि त्यांचे मन  चौथऱ्यावर गेल्याशिवाय भरणार नाही , फक्त प्रसिद्धीसाठी जर कुणी सवंग काम करत असेल तर त्याचे कौतुक कसले ,  मला शिंगणापूरच्या  घटनेवर वेळ घालायचा नाही तुम्हाला मुक्ता दाभोलकर काय म्हणाल्या यावर घेऊन  जायचे आहे "शनिशिंगणापूरच्या महिलांच्या दर्शनबंदीबाबत माध्यामांनी राजकीय पक्ष आणि पक्षातील महिला नेत्यांना याबाबत छेडावं. अशी बंदी ही केवळ हिंदू धर्मात आहे का? तसं अजिबात नाही. तर भारतात प्रत्येक धर्मामध्ये थोड्याफार प्रमाणात असंच आहे.” तर मिडिया व बंडखोर व्रतींना निवडक धर्माच्या रीरीवाजावारच आक्षेप का घ्यावा वाटावा म्हणजे इतर धर्मात कितीतरी प्रथा आहेत त्याच्या विरोधात कुठली महिला वा महिला नेत्या जाणार आहेत का ? मुस्लीम समाजात महिला मस्जिद मध्ये जात नाहीत मग महिला तिथे आंदोलन करणार आहेत का ?  

       म्हणून केवळ सवंग लोकप्रीयेतेत जर कुणी एखादे अनावश्यक कर्त्य करत असेल त्याला किती महत्व द्यावे याचे भान आपल्या समाजमनाला येणे गरजेचे नाही काय ? मला आणखी एक बाब निदर्शनास आणायची आहे असे भारतातच का होते म्हणजे नासावाल्या अमेरिकेत देखील अनेक परंपरा आज हि जपल्या जातात तिथल्या चर्च मध्ये महिला पादरी पासून दूर उभ्या राहतात तेवा तिथल्या प्रगत महिला त्यासाठी तो नियम तोडत नाहीत किवा सवंग लोकप्रियतेसाठी कुठला प्रकार करतच नाहीत .  काही नियम पाळण्यात जर कुठले नुकसान नसेल तर त्या मर्यादा वा तोडण्यात कसला फायदा आहे  हे कुणीतरी सांगावे ?  म्हणजे त्यासाठी कुठली व्रतवाहिनी ब्रेकिंग न्यूज दाखवण्याचा प्रश्नच येत नाही  ? आमच्याकडे मात्र आम्हाला हे नेहमी लागते , आमचे माध्यमे हे नेहमी उदान समुद्राच्या लाटेवर स्वार होऊन बातमीदारी करतात कारण त्यांना तळ गाटायची न आवड आहे न त्यांचा आवाका ?  

     मुस्लीमातल्या अनेक परंपरा स्त्रिया करिता अत्यंत मर्यादा टाकणाऱ्या आहेत त्या तोडाव्यात असे मला म्हणायचे नाही मात्र आमच्या स्वतंत्र भारताची माध्यमे त्या बाबद कधी बोलत नाहीत किवा त्यावर कुठे महिला नेत्रत्व बोलत नाही ? आणि हो परंपरा आणि नियमाविरुद्ध घसा फाडणाऱ्या वाहिन्या ज्यावेळी तास तास हे रत्न वापरा तुम्हाला धन प्राप्त होणार असे सांगत असतात त्यावेळी या वाहिन्यांनी काय आपली बुद्धी गहाण  ठेवलेली असते काय ?  त्यावेळी यांचा बुद्धी प्रमाण्यवाद कुठे गेलेला असतो , रोज सकाळी राशी भविष्य सांगून श्रोत्यांनी असे वागावे तसे करावे याचा फुकट सल्ला देणाऱ्या वाहिन्यांनी अंधश्रधेवर बोलावे काय ? म्हणजे आधुनिक विज्ञान वादी जगात वावरायचे प्रगतीचे स्वप्न उराशी बाळगून देशाला महासत्ता बनवायची भाषा करायची आणि दुसऱ्याबाजूला  हीच माध्यम रत्न , भविष्य , पूजा  याबाबद सल्ला देतात हे  खूपच अतार्किक नाही काय ? मला कुठल्या परंपरेच्या विरोधात जायचे नाही अथवा वाहिन्यांच्या अर्थकारणात परंतु या दरम्यान भरडल्या जाणाऱ्या जनमानसाच्या वेळेची काळजी वाटते, या चर्चेच्या गुर्हाळातून बाहेर काहीच निघत नाही फक्त विकास आणि वस्तुनिस्त प्रश्नापासून समाजाचे अवधान विचलित केले जाते याचे एक विश्लेषक म्हणून वाईट वाटते  म्हणून हा शब्द प्रपंच .
या विषयावर खूप काही लिहायचे आहे त्या साठी आपण वेळ  द्या 

 


 

ताजे लेख

 भाई मुझे भी आना है

लहान पनीची आठवण आहे , तसे सर्वांच्याच भूतकाळाचा हा भाग असावा , गल्लीत गारीगार विकणारा , ...

कॉपी  पेस्ट  दलितांचा आत्मघात 

काल बीड मध्ये दलितांचा मोठा जनसागर रस्त्यावर उसळला , नेत्यांच्या हाकेला ओ देत ...

दसऱ्याचे सिमोलंघन

  पुरोगामी नेतृत्वाला अध्यात्माचा गड लागतोच कशाला ? भक्तीचा भाव का ...

ताई जर साहेब असते तर

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या दिग्विजयी राजकीय आयुष्यात  झालेल्या भरभराटीत ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king