01 October

ताई जर साहेब असते तर

if saheb is there
By भागवत तावरे
  • 1843 View



स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या दिग्विजयी राजकीय आयुष्यात  झालेल्या भरभराटीत भगवानगडाला अन्यन्य साधारण महत्व आहे . राजकीय नेते म्हणून इतरांना गडाची तटबंदी अडसर असायची मात्र स्व गोपीनाथ मुंडे यांना गडाचा आशीर्वाद मुबलक मिळायचा . असा एक मंतरलेला काळ राज्याने नगर जील्ह्यातील भगवानगडावर पाहितला आहे . त्यातूनच सत्ता अन गडाचा विकास हे समीकरण पुढे आले . मुंडेंचा राजकीय दबदबा वाढला अन त्यांना प्राप्त झालेला लोकाश्रय राजकारणातला मोठा जनभांडवलदार म्हणून सिद्ध करून गेला . अनेकदा त्यांच्या राजकीय प्रस्थास भगवानगडाच्या तटबंदिने सुरक्षित केलेलं आहे . स्व.गोपीनाथ मुंडे अन वंजारा समाज एकमेकास पूरक होण्यास भगवानगड दुवा ठरलेला आहे याची साक्ष दस्तुरखुद्द मुंडे साहेबांनीच आपणास गडावरून मुंबई दिल्ली दिसते असे सांगून दिलेली आहे . पुढे हा गड जातीय भिंतीत लीपण्याचा यत्न झाला अन त्यातून अठरा पगड राबता भगवानगडावरून कमी होत गेला हे देखील सत्य आहे.
आज स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस ना पंकजा मुंडे गडावर दसरा मेळाव्यावरून चर्चेत आहेत . २९ सप्टेंबर २०१६ ला १०० चारचाकी ताई समर्थक भगवानगडावर गेले अन मठाधिपती नामदेव शास्त्री यांना ना पंकजा मुंडे यांना गडावर दसरा मेळावा घेऊ द्यावा असी मागणी करू लागले . तत्पूर्वी बुलढाणा , बीड भागातील काही ग्रामपंचायत ठराव गडावर धाडले गेले, यासाठी की मेळावा होऊ द्या . आता या "होऊ द्या" मागणीत समर्थकांचा भक्तीभाव किती अन राजकीय लाभभाव किती हा यक्षप्रश्न नक्कीच नाही . पुढे एक पत्रकार परिषद प्रायोजित करून समर्थक मंडळींना शाश्त्रींना जर गादीवर बसायचे तर ....अशी तंबी दिल्याचे वर्तमानपत्रातून वाचायला मिळाले . हे नक्क्कीच गडाच्या अस्मितेला अन साहेबांच्या समाजकारणाला अंतर्मुख करणारे आहे . ताई समर्थक नामदेव शास्त्री यांना थेट एकेरी अन अर्धनावाने बोलतात , इथे ना.पंकजा मुंडे यांना देखील हा विचार करावा लागणार आहे की त्यांचे समर्थक चक्क गादीला दुषणे देत आहेत. नामदेव शास्त्री हे भगवान बाबांच्या पवित्र गादीवर बसलेले आहेत किमान त्या गादीचा अवमान तर करू नये अश्या भावना असणारा एक मोठा वर्ग आहे जो ताईचा मतदार देखील आहे . शोशल मीडियात नामदेव शाश्त्रीचा आसाराम बापू करा असे संदेश कोण पसरवत आहे याचा देखील शोध घेतला पाहिजे . सोशल मिडियाने माथेफिरूंना चार भिंतीत दिलेले अधिकार चार चौघांना उघड्यावर एकमेकांचे डोके फोडायला मजबूर करत असतील तर मात्र दसऱ्याच्या सोनेलुटी पूर्वी सुवर्णमध्य अपेक्षित आहे, नाही तर २९ तारखेची रेटारेटी त्याची नांदी ठरेल ज्याची भीती नामदेव शास्त्री यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केलेली आहे . मठाचे महंत नामदेव शास्त्री दसरा मेळाव्याला विरोध करताना तर ना पंकजा मुंडे मेळावा घेण्याचे वक्तव्य करताना दिसत आहेत . शास्त्री यांनी यासंदर्भात लेखी स्वरुपात प्रशासनाला कळवताना दसरा मेळावा झाल्यास अप्रिय घटना घडण्याची भीती वर्तवली असून त्याचे घोंगडे प्रशासनाच्या गळ्यात टाकले आहे तिकडे सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे या कुठल्याही परिस्थितीत मेळावा घेऊन वारसा चालवण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत   . अश्या परिस्थितीत दुसरे समाजाचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते आ धनंजय मुंडे या सर्व हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन असल्याची निरक्षणे आहेत. बीड जवळ असणाऱ्या नारायण गडावरून भगवान बाबा जेव्हा पाय उतार झाले , तेव्हा बाबांचा  पर्यायी गड निर्माण होण्या अगोदर खोकरमोह  येथे थापी ४० एकर जमीन आणि शिवारातील हवेली सोना व बाबू मिसाळ यांनी देऊ केली मात्र बाबांना तो पर्याय रुजला नाही . ज्यानंतर १९५१ ला नगर जिल्ह्यात धौम्म्यगडाची मुहूर्तमेढ रोवली , भगवान बाबांनी नारायण गड सोडल्यानंतर अनेक लोकांना घेऊन वारकरी पताका तिथे जोमाने उभा राहिली ,त्या वेळचे शेवगावचे आमदार बाळासाहेब भारदे स्वत  त्या गडाच्या पायाभरणीचे अध्यक्ष राहिले .धौम्म्य डोंगरावर गडाची उभारणी सुरु झाली जी लोकांनी आपल्या तन मन धनाने पार पाडली .
१ मे  १९५८ रोजी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण यांच्या हस्ते भगवान गड असे धुम्म्या गडाचे नामांकरण झाले यावेळी लाखोचा समुदाय गडावर होता ,ज्याची आठवण नामदेव शास्त्रींनी गोपीनाथ गडाच्या लोकार्पनावेळी दिली आणि गड कसा सर्वव्यापक भावनेतून उभारला होता हेच सांगितले , नारायणगडावरून पायउतार होताना जो अपमान भगवान बाबांचा झाला होता  तो अत्यंत निंदनीय होता ज्याचा खोलवर परिणाम आज हि  समाजात पाहायला मिळतो . बाबा इतका समाज धीरगंभीर नव्हता आणि असण्याची अपेक्षा हि धरणे चुकीचे कारण बाबांकडे त्यांच्यावरील आरोप झेलण्यासाठी वैराग्य आणि सय्यम जेवढा होता तेवढा  वंजारा समाजाकडे होता असे नाही त्यातूनच  स्व .गोपीनाथ मुंडे हे राजकीय नेत्रत्व आणि भगवान गडाचे महत्व वाढले हे कुणालाही नाकारता येणार नाही . भीमसिह महाराज असे पर्यंत जो गड सर्वांचा होता तो त्यांच्या नंतर फक्त वंजारा समाजाचा अशी  बिरुदावली रूढ झाली जी स्व .गोपीनाथ रावांच्या राजकीय विकासाच्या पथ्यावर पडली , दरम्यान च्या काळात मिळालेली सत्ता संधी स्व. मुंडेंनी गडाच्या आणि समाजाच्या प्रगतीस कारणी लावल्याने  भगवान गडाच्या भीती अधिकच राजकीय आणि जातीय रंगाने रंगल्या जे काळाच्या ओघातच आले , जे सयुक्तिक हि मानले गेले , मात्र असे समीकरण बाबानी भगवानगडावर कधी चढू दिले नव्हते , विशेष म्हणजे ज्याचा अधिक त्रास त्यांनाच झालेला असताना , त्यांनी जातीवाद कधीच होऊ दिला नाही .यातून भगवान गड हे कुठल्या एका जातीचे व पंथांचे न राहता अठरापगड जातींना एका सुतात बांधणारा ठरला होता जो नंतर दुर्दैवाने राहिला नाही हे मान्यच करावे लागेल  .
      मागच्या काळात धनंजय मुंडे यांना देखील अपमानित होऊन गडउतार व्हावे लागले होते म्हणून त्यांच्या मनात देखील ते शल्य असू शकेल . त्यामुळे धनंजय मुंडे देखील समाजातील आपल्या पाठीराख्यांना कुठला संदेश देतात यावर देखील राजकीय खल चालू आहेत. आज वर्तमान काळी नामदेव शास्त्री अन ना.पंकजा मुंडे यांच्यात बेबनाव आहे. या परिस्थितीच्या मुळाशी आचारसहिता भंगातून नामदेव शास्त्रींना ३ महिने गडावरून फरार रहावे लागण्याचे कारण बोलले जात आहे. परळी येथील स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळास 'गोपीनाथ गड ' असे नाव देऊन समाजात दोन गड असी परिस्थिती तयार करणे शाश्त्रींना रुचले नाही अन त्यातली खदखद त्यांनी गोपीनाथ गडावरूनच ना.पंकजा मुंडे यांच्या समोर अप्रत्यक्ष्य बोलून दाखवली होती . भगवान गडाचा श्वास मोकळा झाला या वाक्याने त्यांनी सारीच भडास राज्यासमोर मांडली अन भगवानगडाचा श्वास कोन्द्ल्याचे दुख बोलून दाखवले. तेव्हाच वंजारा समाजात लहानमोठे का व्होईना मात्र दोन प्रवाह तयार झाले. आता यापुढे गडावरून राजकीय भाष्य नाही असे अधिकृत बोलून त्यांनी  दसरा मेळाव्यासाठी भगवान गडाचे दरवाजे बंद असे फर्मान मठाधिपती म्हणून तेव्हाच काढले . दिल्ली मुंबई दिसणारी टेकडी  कुणाला सहज सोडावी वाटणारच नव्हती  . म्हणून श्रद्धेय गडावरचा दसरा मेळावा ना पंकजा मुंडे यांना हवाच आहे मात्र त्याच धर्तीवर गडावर राजकीय भाष्य नको असा तार्कीकदृष्ट्या सयुक्तिक युक्तिवाद शाश्त्रीकडून समोर येत आहे . नामदेव शास्त्री यांनी ना पंकजा मुंडे यांना भगवानगडाची लेक असा उल्लेख केला आहे .
म्हणून लेकीला माहेराला यायला कुणाच्या परवानगीची गरज नसते मात्र लेकीला माहेरच्या संसारात फारसे हस्तक्षेप करता येत नाहीत हा देखील एक रिवाज आहे . कारण तिथला संसार सावरणाऱ्या सुना तिथला हक्क राखून असतात म्हणून माहेराला जावे साडी चोळी चा मान घ्यावा, ख्याली खुशाली यापलीकडे एकदा सासरी गेलेल्या लेकीला माहेराने अधिक अधिकार दिलेले नाहीत. हि देखील महाराष्ट्राचीच परंपरा आहे. दुसरा एक अधिकार जो नामदेव शाश्त्रींना नाकारता येणार नाही तो ना पंकजा मुंडे भक्त म्हणून गडावर केव्हाही येऊ शकतात हा . मात्र तिथे भगवान गडाच्या मर्यादा ज्या नव्याने लागू झाल्या आहेत त्या देखील कर्तव्य म्हणून ना पंकजा मुंडे यांनी पाळाव्यात असा एक सामाजिक आवाज आहे . कारण ज्या साहेबांच्या वारस ना पंकजा मुंडे आहेत त्यांनी देखील प्रथम गडाचा विश्वास संपादन केला अन नंतरचा प्रवास केला . तसे आज नाही ज्या शक्तीस्थळाने साहेबांना भरभरून दिले त्या साहेबांच्या लेकीला गडाचे दरवाजे का बंद होतात हा देखील चिंतनाचा विषय असू शकेल . दरम्यान ना पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास देखील काटेरी झुडपातून वाट काढत असल्याचे अनेक निरक्षणे आहेत. असो राजकीय निर्णय अन वाटचाल हा ज्याचात्याचा कलम १९ अखत्यारीतला विषय आहे. आपणास त्याचा  आक्षेप नाही मात्र जेव्हा आपण सामजिक जीवन जगत असता तेव्हा मात्र स्वहित स्वविचार याला बगल देऊन सामाजिक अवधानाचे भान ठेवावेच लागते , जे स्व गोपीनाथ मुंडे यांनी ठेवले अन त्यांच्या वारसदार ना.पंकजा मुंडे यांना ठेवताना दमछाक होत असल्याचे दिसत आहे . ज्या प्रकारे साहेबांनी गडाची गरिमा कधी न ढळू देण्याची जबाबदारी सांभाळली , नेहमी गादीचा सन्मान राखला , पर्यायी वाहनावर उभा राहून दसरा साजरा केला अन विचारचे सोने लुटले याच युगनायकाच्या कन्या पंकजा मुंडे आज दसरा मेळावा घेण्यासाठी वेगळ्या मार्गाने यत्न करत असल्याचे बोलले जात आहे . एक निष्पक्ष विचार म्हणून लाखो समाजाच्या भावनेचा केंद्रबिंदू असणारा भगवानगड कुठल्या दोन व्यक्तीच्या भांडणाचा केंद्रबिंदु ठरू नये अशी सामाजिक मागणी आहे . याचा विचार शास्त्री अन पंकजा मुंडे या दोन्ही समाज नेत्रत्वांनी करावा . सर्वात महत्वाचे म्हणजे गडाची गरिमा डागाळली जात असताना वाद वाढवण्यात कुठलाच अर्थ बाहेर पडणार नाही , पंकजा मुंडे यांच्या राजकीय स्पर्धेत त्यांचा हुकमी एक्का समजला जाणारा वंजारा समाज जर मेळाव्यावरून विभागला जाणार असेल तर ज्या सामजिक ऐक्यावर साहेबांनी दिल्लीचा वेध घेतला त्या ऐक्यास ताईना मुकावे लागेल . त्यांची राजकीय स्वप्न अन महत्वकांक्षा पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांचे राजकीय भांडवल जर दुभंगले तर न भरून निघणाऱ्या राजकीय नुकसानीस त्यांनी सिद्ध रहावे. राज्यातल्या कुठल्याही अभ्यासकाच्या नजरेतून सुटणार नाही असे विभाजन दसरा मेळाव्यावरून समोर येत आहे . ज्या शक्तीपिठावर साहेबांचा दिग्विजय साकारला आज त्याच शक्ती पिठावर लेकीला चाचपडावे लागते , तसे हे दुर्दवीच.मात्र त्यासाठी लेकीचे काही चुकले आहे काय याचा विचार आता चर्चिला जात आहे . समाजात उभे राहिलेले तंटे निस्तरायची परंपरा ज्या गादीकडे राखून आहे  त्याच गादीवरल्या वारसदाराला साहेबांचे समर्थक साहेबांच्या वारसदारांना कुठला एक मेळावा घेऊ द्यावा यासाठी अरेरावी अन आसरामांची कोठडी दाखवत असतील तर त्यास त्रयस्थ काय बोलणार .  ताई गडावर लेक अन भक्त म्हणून जाऊ शकतात अन गडाच्या पायथ्याला दसरा मेळावा देखील घेऊ शकतात. विचाराचे सोने वाटू ही शकतात. जे त्यांच्या समर्थकाने लुटावे अन नसता वाद टाळावा असी कुणी सूचना केली तर ती हट्टापायी मंजूर होणार की नाही, ही काळजीच आहे ?

ताजे लेख

 भाई मुझे भी आना है

लहान पनीची आठवण आहे , तसे सर्वांच्याच भूतकाळाचा हा भाग असावा , गल्लीत गारीगार विकणारा , ...

कॉपी  पेस्ट  दलितांचा आत्मघात 

काल बीड मध्ये दलितांचा मोठा जनसागर रस्त्यावर उसळला , नेत्यांच्या हाकेला ओ देत ...

दसऱ्याचे सिमोलंघन

  पुरोगामी नेतृत्वाला अध्यात्माचा गड लागतोच कशाला ? भक्तीचा भाव का ...

ताई जर साहेब असते तर

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या दिग्विजयी राजकीय आयुष्यात  झालेल्या भरभराटीत ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king