06 July

दोन गुजराती एक देश , बाकी परदेश 

two gujrati
By भागवत तावरे
  • 305 View

 

लोकशाही च्या राजकीय मंचावर द्विपात्री नाट्यधूम, मोदी"शाही" 

 

भाजपप्रिय अन समर्थनीय लिखाण करणारे भाऊ नावाचे मोठे नाव स्तंभलिखाणाप्रदेशात आहे . खा सुप्रिया सुळे यांनी त्यांना फोन करून दोन गुजराती संदर्भात काहीतरी बोलल्याचे भाऊंनी सांगितले . यावर त्यांना काय वाटले हे येईल तेव्हा समोर आणले जाईल मात्र सुप्रिया सुळे यांचा रोख लक्षात घेता देशाने लक्ष्यात घेण्यासारखा तो मुद्दा नक्कीच आहे म्हणून आजचा शब्दप्रपंच . 

देशाचा रिमोट कोल्हापूरच्या जावई बाप्पुकडे आहे . पडद्याच्या मागे राहून त्यांच्या हातून देशाचे राजकीय मंचसंचालन केले जात आहे . देशाचा राष्ट्र्पती कोण व्हावा या पासून ते उत्तरप्रदेश चा नवाब कोण असावा पर्यंत तेच निर्णय घेतात .  तो किती बरोबर वा का घेतल्याचे सांगतात . अलीकडे कोविंद यांची दलित अन त्यांच्या संघर्ष निकषातून झालेली निवड त्याची साक्ष आहे . होय अमित शहा नावाचे स्क्रिप्टरायटर देशाचे भाग्य लिहण्याचे वर्तमान काम करत आहे . नरेंद्र मोदी नावाचे पात्र निव्वळ स्वयंभू नसून त्यांच्या मागे उभे असलेले अमित शहा हेच देशाचे शहेंशहा समजले जावेत एवढी किंमत महाराष्ट्राचे जावई असणाऱ्या या माणसाला भाजपसह देशभरात आहे . मोदी शहा नावाच्या जोड गोळीने फक्त भारताचे नाही तर आता जगाचे राजकारण करण्याचे ठरवले असावे , म्हणूनच अमेरिका ते चीन असा घेर धरणाऱ्या मोदीनी देशाच्या सुरेक्षेंला वाऱ्यावर सोडून इस्रायल चे पाणी पिले आहे . देशातील घटनेला घाबरगुंडी बसावी असी सत्ता"शाही" देशात सुरु असून लोकशाही तिच्याच मदतीने जखडून टाकली जात आहे काय यावर आता काळजी केली पाहिजे . 

  देशात मंत्री फक्त नावाला असावेत म्हणून नोटबंदी पासून ते जीएसटी ची पैरवी स्वत नरेंद्र मोदी करतात कारण जेटली यांना थंडी वाजतेय म्हणून त्यांनी शाल पांघरून पत्रपरिषदाचा सोपस्कार करावा लागत आहे . सुषमा स्वराज्य खरच परराष्ट्र पंत्री आहेत का फक्त ट्विटरमंत्री यावर देखील छोटाखाणी प्रबंध होऊ शकेल कारण सारे जग फिरून इतिहास निर्मितीचे काम फक्त नरेंद्र मोदी करत आहेत . हिंदी भाषेने त्यांची जगज्जेती मोहीम आपण हा लेख वाचत आसताना इस्रायल या देशात असेल . आज पर्यंत त्यांचा प्रवास अन बोलण्यातला उत्साह देखील ऐतिहासिक असला पाहिजे . पहिले पंतप्रधान काही बोलत नव्हते अन मोदी कुणाचे ऐकत नाही असी परिस्थिती आहे . न्यूयार्क , लंडन , हेग , टोरांटो , दुबई , शांघाय , ते सिडनी असा कुठलाच देश या अन तेथील शहर मोदी लाटेत वाहिले नाही असे नाही . लंडन ला मोदींचा विरोध करणारे शेकडो लोक रस्त्यावर होते मात्र ते भारतातील मिडिया च्या दृष्टीने कफल्लक असावेत . 

 देशाची सारी सूत्र दोन लोकांच्या हातात अन एका व्यक्तीच्या नावे असल्याचे आता आम्हाला मान्य करावेच लागेल अन २०१९ पर्यंत तरी त्यात बदल होईल असे वाटत नाही . दुर्दैवाने देशाचे  राष्ट्र्पती पहिल्यांदा भाजपचे अन दलित असणार आहेत तसी परिस्थिती भाजपने तयार केली आहे . उमेदवार निवडीपासून ते घोषनेपर्यंत मोदीअन शहा यांचा परिणाम दिसून येत आहे . देशात होणारे घटनात्मक बदल आणखी कुठले अंतर गाठणार आहे याचा विचार केला तर काळजात धस्स व्हावे . भाजपच्या अजेंड्यात असणारे विषय आणखी तडीस लागायची आहेत असे समजले तर धक्का बसला नाही तर भले . भाजपच्या गोटात प्रत्येक निर्णय आज शहा घेतात असे म्हटले तर वावगे नाही . पक्षात कोण कधी काय होणार हे बीड ते आष्टीला माहित आहे . देशात लोकशाही असली तरी भाजपमध्ये मोदी"शाही  असल्याचे दिसून येत आहे . देशात केव्हा कुठे काय करायचे याचा सुपीक दिमाग अन आवश्यकतेपेक्षा अधिकची सत्ता आता या जोडगोळी कडे उपलब्द आहे . 

 मोदी भाषण करत असतात तेव्हा शिट्ट्या घोषणा (मोदी मोदी ची गुंज ) नियोजित करण्याचे काम करणारी एक यंत्रणा आहे . जी एस टी वर पंतप्रधानाचे त्या दिवशीचे दिल्लीतील भाषण झाले . देशातल्या सी ए कडून मोदी मोदी चा जप जपला गेला . कुणाला आश्चर्य वाटले नाही कारण मोदी म्हणजे नवा आयएसआय मार्क बनलेत . विश्वासहर्त्तेचा मापदंड म्हणजे मोदी असे झाले आहे . भाजपचा यापुढील प्रवास देखील याच प्रलोभनाच्या भांडवलावर होईल काय असा प्रश्न पडतो .

सदोष परराष्ट्र धोरण ? 

लाहोर च्या भेटीत नवाज शरीफांची गळाभेट घेणारे नरेंद्र भाई अलीकडे पाकिस्तानच्या विरोधात अंतराष्ट्रीय पाठींबा मिळवत आहेत . जगातला मोठा विनोद ठरावा असा हा युक्तिवाद अमेरिका अन इस्रायल दौऱ्याच्या बातम्या करताना मोठी माध्यम करत आहेत . जर भारत पाकिस्तान लष्करी पेच निर्माण झाला तर सातव्या मिनिटाला भारतीय सैनिक लाहोरच्या गल्लीत गोट्या खेळू शकत असताना , त्यासाठी चीनला खिजवून अमेरिकीची खुशामत मोदी कशाला करत होते . अहमदाबाद च्या झोपल्यावर चीनच्या पंतप्रधानाची खुशामत करणाऱ्या मोदींनी शांघाय मध्ये जावून काही कमी भाव खाल्ला नव्हता . असे असताना हिंदी चीनी भाई भाई ची वाट लावण्याचे काम झाले नाही काय  . विशेष आणखी एक असे कि आज इस्रायल मध्ये जावून नरेंद्र मोदी यांनी जिथे ३० लाख ज्यांना हिटलर ने मारले त्या वोशीम होलीकोष्ट (होली म्हणजे पूर्ण आणि कोष्ट म्हणजे जाळणे ) ३० लाख यहुदीची कत्तल करणाऱ्या हिटलर च्या कृतीचा अत्यंत कडवट विरोध केला . ज्या हिटलर कृतीचा त्यांनी कडाडून विरोध केला त्या हिटलर वृतीचा मात्र मोदी उदो उदो करत आहेत ? जर्मनीचा दौरा यावर चांगला प्रकाश टाकेल . 

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king