27 July

राजेंची दौड अटकेपार 

 king across the line
By भागवत तावरे
  • 988 View


सामाजिक एकता "ब्रेकिंग" करणाऱ्या वृत्तवाहिन्या अन त्यांचे अभ्यासू  समालोचक 
       ना कुठले माध्यम होते ना कुठले प्रचारक तरी स्वराज्याची जरी पताका फडकत होती , आम्हा पातक्यांच्या पापांनी खंडर झालेली तेवढी किल्ले साक्ष देत होती , तरी महाराष्ट्राच्या देव्हार्यातून जागर त्याचा होत होता , तो होत एक शिवबा म्हणून जगलो आम्ही असे सांगणारा एक सांप्रदाय होता . शिवबा चा पोवाडा तुकोबा ते ज्योतिबा, पिढी टू पिढी अग्रप्रेषित झाला अन महाराष्ट्राच्या मातीत अन मनात कायमचा रोपण देखील मात्र अलीकडे महात्म्यांना जातीत अन त्यातून सांस्कृतिक वितुष्ट तयार करण्यासाठी लोकांना भूरळ घालताना आजची सवंग माध्यम कुठल्या टोकाला जातील याचा नेम नाही . वरील शोकांतिका यासाठी की साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांची अटक अन जामीन दरम्यान वृत्तवाहिन्यांनी जो उदम माजवला माफ करा गाजवला होता तो पाहणे म्हणजे घोडचूक ठरावी . बातम्या देण्याच्या नावाखाली वर्तमान वृत्तवाहिन्या पदरमोड करून समाजाला जेव्हा शहाणपण शिकवायला निघतात तेव्हा टी आर पी चा धंदा होतो मात्र समाजाची एकताच ब्रेकिंग होते याचे भान तिथल्या हळकुंडाना राहत नाही म्हणूनच      अखेर छत्रपतींच्या वारसाला अटक झाली , बहुसंख्येने लोक त्यांच्या समर्थनार्थ साताऱ्यात रस्त्यावर उतरले , मात्र कुणी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले नाही , अटकेचा खेद व्यक्त केला गेला मात्र कुठल्याच शिवभक्ताने गालबोट लागू दिले नाही , अन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सवैधानिक अधिकाराने त्यांना जामीन देखील मिळाला , मूकमोर्चा नंतर मिळालेली विनय अन अहिंसेची शिकवण घेऊन ऐतिहासिक पातळीवर एकत्रित आलेल्या समाजाने अटकेचे कडू घास देखील पचवले , मग एका वृत्तवाहिनीच्या महापुरुष समालोचक बेंबीच्या देठापासून उदयन राजेना अटक का होत नाही ? असे का विचारात होता . राज्यातील बहुसंख्याक समाज त्या टीव्ही वाल्या बाईला पेटवायचा होता काय ? असे विचारले पाहिजे . 
   कारण , सलमान खान ला चक्क शिक्षा झालेली असताना त्यास जामीन मिळू शकतो तेव्हा कुणाला हरकत नसते ,सलमान च्या बाबतीत तर दोन जिल्हा न्यायालयाच्या निकालामध्ये शिक्षा लागलेली असताना मुंबई उच्च न्यायालयाने त्याच दिवशी  सेम डे जामीन दिलेला , मात्र महाराजांच्या विरोधात फक्त तक्रार आहे अन ती हि म्हणे दोन लाख खंडणी मागितल्याची अन तिकडे सलमान ने चक्क ४ माणस त्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडली असे अनेक जन म्हणतात . त्याला जामीन मिळतो त्याचे फटाके वाजतात तेव्हा या वृत्तवाहिन्या त्याच्या घरापर्यंत त्याचे काय काय दाखवत नाहीत , तेव्हा यांना तक्रार नसते मात्र इथे महाराजांना अटक का होत नाही , ने काय अदृश्य मिस्टर इंडिया आहेत का असे बोम्बलनाऱ्या वाहिन्या बातम्या देण्याचे कर्तव्य बजावत होत्या का चीथावन्या देत होत्या हा खलाचा विषय ठरावा . 
  ज्या माणसाच्या स्वागतात सातारा पाच लाखाच्या तोफांनी निनादले त्या राज्याच्या विरोधात्र दोन लाखाची खंडणी म्हणजे कायद्याच्या सहारा घेऊन केलेली काडी म्हणू नये काय .उदयनराजेंची ही रॅली नगरपालिकेपासून कमानी हौदापर्यंत गेली. या रॅलीत खा. उदयनराजे यांनी लहुजी यांच्या पुतळ्याजवळ एका सफाई करणार्‍या महिलेची आस्थेने चौकशी केली. यादरम्यान समर्थकांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. ‘आया है राजा, लोगो रे लोगो, उदयन महाराज की जय, एकच राजे उदयनराजे, आला रे आला सातार्‍याचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी करण्यात येत  होती. कमानी हौद व जलमंदिर पॅलेस या ठिकाणी आया है राजा या गाण्यावर डॉल्बीसुध्दा लावण्यात आली होती. कमानी हौद परिसरात खा. उदयनराजे यांनी काही ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. तसेच कार्यकर्त्यांचीही चौकशी केली. सातारा येथील  पोवई नाक्यावर आपल्या वाहनांच्या ताफ्यासह दाखल झाले. पोवई नाक्यावर काही वेळ त्यांनी आपली गाडी थांबवून जवळच्या कार्यकर्त्यांची  विचारपूस  केली. महाराज असण्याचा कुठला अभिमान या रांगड्या राजामध्ये कधी दिसला नाही , सामाण्याच्या घरात जाऊन जेवणारा अन ३४ हजार एकर जमीन असणारा आद्यवतनदार जेव्हा हजारो लोकांना मोफत जमीन कसण्यास देतो हे आमच्यासाठी शून्य कसे असू शकते . हजारो कोटीला चुना लावून लोक भुर्कन उडून जातात तेव्हा आमची तक्रार नसते मात्र टीव्ही वाल्यांना राजाला अटक का होत नाही असा प्रश्न विचारावा वाटावा याचा खेद वाटतो . 
 शिवरायांच्या प्रत्येक जयंतीला आपण सुखाने जगत असल्याचे श्रेय रायगडाच्या पायथ्याला देतो मात्र त्याच स्वराज्यातील केसरकर नावाचा मंत्री अटक कशी होत नाही म्हणून कशाला बाईट देतो यावर अंतर्मुख व्हायला पाहिजे . छत्रपतींच्या नावावर शिवसेना उभी करणाऱ्या  बाळासाहेबांना  बेड्या ठोकताना हातभर फाटणारी यंत्रणा थेट छत्रपतींच्या वंशजाला अटक करताना किती निर्ढावली होती याचे प्रत्येक शिवप्रेमीला शल्य बोचणार . इतरांना सैल अन सोडत देणारी यंत्रणा राजेंना का सैल देत नाही असे मला म्हणायचे नाही मात्र स्वराज्याच्या वंशजावर खंडणीचा गुन्हा दाखल करेपर्यंत आम्ही बघे झालो याची खंत वाटत्ते . 
   खा. उदयनराजे समर्थक कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत होते. पोलिसांनी तर कर्णा लावून शांतता राखण्याची विनंती केली.  हे कालचे चित्र एकीकडे अन टीव्ही वाल्यांचा आक्रस्ताळेपणा दुसरीकडे . 
  जेव्हा  खा. उदयनराजे स्वतला पोलिसांसमोर हजर करत होते तेव्हा तिथे एकही अधिकारी थांबत नाही मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करताना त्याच खाकीला कुणाची फूस वा जोर मिळाला याचा देखील अभ्यासकांनी शोध घेतला पाहिजे . तीन तीनदा अस्मितेवरून समाजाला अंतर्मुख होण्याची वेळ आणणाऱ्या घटना कशाला घडत आहेत . कुणी निंबाळकर या प्रकरणात आपली ताकत लावत असेल तर ते तपासले पाहिजे ?  त्या निंबाळकरांच्या पाठीशी असणारी कुठली पक्षीय राजकीय शक्ती आहे हे देखील चाचपले पाहिजे अन राजकीय कोट्या अन डाव खेळणाऱ्या याकु डोक्यांना देखील अस्मितेची ढाल करू नये हे कुणी शिवप्रेमीने सनदशीर पणे समजावून सांगितले पाहिजे

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king