14 September

शूउउउउ बलात्कार चालू आहे 

rape is start .....keep silance
By भागवत तावरे
  • 1204 View


चला मेणबत्तीच्या बुडाला 
 समाजाचा बिपी वाढवणारे आंबट चित्रपट आणि तोकड्या कपड्यातील लेकी . 
२०११ पासून दिल्ली ते गल्ली मेणबत्त्या अन मुकमोर्चे निघत आहेत , निरक्षर काळात जेवढे महिलावर अत्याचार होत नसावेत त्यापेक्षा अधिक पटीने मुलींच्या इभ्रतीचे लचके तोडली जात आहेत . एकीकडे आम्ही महासत्ता बनू पाहत असल्याच्या वावड्या कानावर येत असताना एकीकडे लेकीवरील अत्याचार राजधानी ते बागपिंपळगाव असे कायमच चालू आहेत . निवेदने निदर्शने अन मेणबत्त्या पेटवून संतापाचे प्रदर्शन होते मात्र समस्या मात्र अधिक वाढत आहे . वाढतच असलेले अत्याचार हि राष्ट्रीय शोकांतिका आहे . देशातल्या सर्वात मोठ्या नेत्यापासून ते गरीब जनतेपर्यंत जो तो नराधमांना शिव्या देऊन बलात्कार विनयभंगाचा निषेध करतो आहे . लाखोंचे मोर्चे स्मशान शांतता घेऊन उरातला दर्द सरकारच्या समोर मांडत आहेत  . कोपर्डी च्या घटनेनंतर लाखोंचे मोर्चे निघून सुद्धा राज्यात स्त्री अत्याचाराच्या शेकडो घटना घडत आहेत . म्हणूनच समस्यांच्या नावाने उर बडवण्यापेक्षा समस्यांच्या मुळाशी असणाऱ्या कारणावर आम्ही कधी विचार करणार आहोत काय ? योगाच्या नावाने जगात शेखी मिरवणारे भारतीय बिपी बघून बघून कसे भोगवादी बनले आहेत , कसे लंपट बनले आहेत , लता मंगेशकर , भीमसिह जोशी यांना ऐकणारा रसिक आता सनी रागिणीचा आंबट शौकीन बनला आहे . 
   नराधमांचे नाव घेतले तर कुणाच्याही मुठी वळतात अन आम्ही त्याला तात्काळ फाशी देऊन मोकळे होतो . मात्र आम्हाला हे ठाऊक आहे का , कि ते नराधम आमच्यातलेच आहेत त्यांनी देखील नराधम हा शब्द ऐकला कि मुठी आवळलेल्या असतात . ज्या शाळेत आम्ही शिकलेलो त्याच शाळेत ते शिकलेले असतात , आमच्यात उठले बसलेले असतात , राज्यातील मुलीवर अन्याय करायला काय दुसऱ्या देशातला नराधम इथे येत नाही . मग तुमच्या आमच्यात राहणारी आमच्यासारखी भाकर खाणारी नराधम कशी काय बनतात यावर कुणी विचार करणार आहे काय ? त्याचे उत्तर जोवर आपल्याला मिळवता येणार नाही तोवर मोर्चे काढण्याचे काम दुर्दैवाने करत राहावे लागणार आहे , कधी खैरलांजी साठी तर कधी कोपर्डी साठी तर कालच्या बागपिंपळगाव साठी असे किती आम्ही मोर्चे काढणार आहोत . यापेक्षा अश्या घटना पुढे होणार नाहीत यासाठी आमची व्यवस्था काय करत आहे यावर चिंतन गरजेचे आहे . काय केले पाहिजे यासाठी समस्येचे मूळ शोधले पाहिजे . म्हणुनच आजचा शब्दप्रपंच . 
  थोडेसे अधिक विस्तारित अन स्पष्ट शब्दात विषय मांडत आहोत , जुन्या हिंदीचित्रपटात नायक नायिका मधील प्रणय दाखवण्यासाठी केमेरां झाडाकडे फिरवला जायचा अन तिथे दोन पक्षी दाखवले जायचे आता मात्र कमेरा वृक्षाकडे नाहीतर नायिकेच्या  वक्षाकडे फिरवला जातो.  नव्हे नव्हे त्यापलीकडे जावून कातडी दाखवण्याची अन पाहण्याची आमची तयारी असते. आम्हाला चुकीचे चालत नाही मात्र फक्त उजेडात अंधारात मग आम्ही देखील काही कमी नसतो . स्वताच्या बायकोचा चार चौघात हात धरणे पाप समजणारे आम्ही लपून सनी लीवोनीला उगडी नागडी पाहत असतो . आपण जसे पाहतो तसेच आमची तरुणाई देखील स्वस्तात आता सनीच्या गुप्तांगाचा मुक्तवावर पाहत असते . अत्यंत जबाबदारीने आपण सर्वांनीच हे मान्य केले पाहिजे कि नैसर्गिक अपवादाने मानवी शरीरात शारीरिक भुकेला जीथावण्याचे काम हे बिबत्स व्हीडीवो करत असतात . बर याला रोखणे तर सोडा आमच्याकडे सनी लिवोनि नावाच्या बाईला सन्मान दिला जातो , तिच्या हाताने उद्घाटने केली जातात , सनी सोबत वैर नाही मात्र एका बिबत्स शरीर प्रदर्शन करणाऱ्या मुलीस भारतात लोकमान्यता मिळाली आहे एवढेच आपल्याला सांगायचे आहे . एकटी सनी नाही भारतात आपल्या गुप्तांगाला लोकांच्या नजरेत पाडण्यात उत्सुक नायिकांची कमी नाही , मागणी वरून पुरवठा हा नियम मान्य केला तर देशात शारीरिक भूक कमालीची वाढलेली यावरून सिद्ध होते . चुंबन दृश्य असणारे चित्रपट पैसा वसूल करतात म्हणजे देशात शरीराची भाषा मान्य होत आहे . कोटीच्या संख्येत लोक डोळ्यांनी बलात्कार करत असतात . विशेष म्हणजे यात फक्त मुले पुढे आहेत असे नाही मुलींना देखील अश्या नायिकांचे आकर्षण आहे , त्यांच्या सारखे तोकडे कपडे घालून घटनेने आम्हाला देखील स्वातंत्र्य दिले म्हणून आता ती मुक्त वावरू लागली आहे . जेव्हा दोन स्वातंत्र्य चुकीच्या वेळी एकमेकासमोर येतात तेव्हा चुकीचा प्रकार घडू शकतो हे मान्य केले पाहिजे . अश्लील चित्रपट हेच बलात्काराचे कारण आहे असे देखील नाही मात्र यामुळे समाजात लैंगिक भूख वाढवली जाते अन मग एकट्यात सापडलेली हरणी फस्त केली जाते, हे देखील आम्हाला मान्य करावे लागेल . ज्या बलात्काराच्या नावाने व्यवस्था बोट मोडत आहे त्याच व्यवस्थेत नराधम घडवले जातात हे आम्हाला नाकारता येणार नाही.  मग हे नराधम जर बिपी बघून अत्याचार करण्याच्या बिंदूपर्यंत पोहोचणार असतील तर आम्ही बिपी नावाच्या खुल्या मैदानाला कुंपण का घालू नये .काल परवा रागिणी इज बक नावाचा प्रोमो पाहण्यात आला , रिया सेन च्या मांड्या दाखवून अन तिच्या अंतरवस्त्रात हात घातलेला नायक दाखवून सदरील चित्रपट आमच्या तरुणांना कुठला संदेश देतो आहे ? ज्या अश्लील किल्पा आमच्या मुलांच्या मोबाईल मध्ये असतील मग त्याच क्लिपा एखादा सरफिरा आमच्या बहिनाना पाठवत नसेल , कशावरून ? स्वातंत्र्याच्या नावाखाली मुलींना दिलेली मुभा जष्ट फ्रेंड च्या मार्गाने कधी शरीराची भाषा बोलते कळत देखील नाही , अगोदर सम्यारम्याने चालू झालेले नंतर पोलिसात तक्रारीपर्यंत जाते , हा नात्यांचा अवमान नाही का ? आम्ही प्रगत झालो म्हणजे आम्ही भारतीय सभ्यतेचे लक्तरे टांगू शकत नाहीत . आम्हाला बलात्कार अन अत्याचार थांबवायचे असतील तर त्या घटना घडण्यासाठी कारणी पडणाऱ्या बाबी देखील रोखाव्या लागतील मग त्यात तुमचे कपडे असतील , मोबाईल असेल वा मग अधिकचे स्वातंत्र्य

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king