22 September

 भाजपचे  फुटबॉलपर्व  अन नारायण राणे 

football by bjp
By भागवत तावरे
  • 532 View

 

राज्यात कुणाची नसेल तेवढी राजकीय फरफट कोकणच्या राजाची होत असावी . वर्तमान अगतिकता सोडली तर नारायण राणे यांचे दोन दशकीय वर्चस्व कुठल्याही राजकीय विश्लेषकाला नाकारता येणार नाही . मात्र राजकारणातले वार्धक्य जिथे इंदिरा गांधीना चुकले नाही तिथे नारायण राणे यांचे काय. त्यामुळे नारायण राणे यांचे राजकीय मुल्य गडगळत असल्याचे नवीन काय ? मात्र यात ते कुठला तरी पक्ष करवून घेत असल्याने नारायण राणे यांचे राजकीय वार्धक्य राज्यातील चर्चेचा विषय बनले आहे .  चार दिवसापूर्वी "महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन" फुटबॉल खेळ महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले अन कॉंग्रेस ने सिंधुदुर्गात पहिली किक मारली . राणेच्या गणपतीची आरती रावसाहेब दानवेंनी केली तेव्हाच कॉंग्रेसने जो संदेश घ्यायचा तो घेतला होता . परभणीच्या राहुल कुर्निसाताला त्यांची नाकारलेली हजेरी राणेंसाठी निर्वाणीचा इशारा होता जो स्वत नारायण राणे यांनी उलगडून दाखवला , आपण कॉंग्रेस सोडत असल्याचे सांगत . भाजपने अद्याप दरवाजा उघडला नसल्याने अन तत्पूर्वीच नारायण राणे कॉंग्रेसमुक्त झाल्याने भाजपने त्यांच्यासोबत फुटबॉल महोत्सव साजरा केला म्हणावा लागेल . 
         वर्तमान राजकीय क्षेत्र दोन पिढ्यासाठी शिदोरी अन प्रारंभ देणारे कुरुक्षेत्र असते  . कुरुक्षेत्रात जर काही मुबलक होते तर तो होता सूड अन त्याच भोवती कुरुक्षेत्रावरील प्रत्येक घडामोड घडलेली आहे , यालाच महाभारत म्हणतात .  वर्तमान राजकीय परिस्थिती मध्ये महाराष्ट्रातील महाभारत देखील वेगळे नाही . नारायण राणे यांच्या शब्दातील तृष्णा , तिडक आणि तडप कमालीची आहे , कॉंग्रेस मध्ये येताना जो हवाला टपाला झाला होता तद्वत कॉंग्रेस वागली नाही असेच त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे . त्यांच्या मागण्या या वयक्तिक पातळीवरच्या होत्या असेच काल सिद्ध झाले आहे . नारायण राणे यांनी नेहमी प्रमाणे "अरे देवा असा का" असा धक्का देण्याचे तंत्र कायम राखले . विलासराव देशमुखांच्या विरोधात चुगली करण्याची सनक आपणास दस्तूर अहमद पटेलांनी दिली असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला . परवा एका वाहिनीच्या चर्चेत देखील भाई जगताप यांनी डील करून प्रवेश करण्याची कॉंग्रेस संस्कृती नसल्याचे सांगितलेले आहे त्यामुळे नारायण राणे यांच्यावर राज्य किती विश्वास ठेवणार आहे ? याच चर्चेत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी नारायण राणे यांना वाट चुकलेले वाटसरू संबोधून नेमक्या शब्दात राणे यांच्या परिस्थितीचे अवलोकन केले आहे . त्यांच्या शब्दांना पर्यायी अन संक्षिप्त शब्दात मांडायचे झाले तर "दोडका " हा शब्द यथोचित असावा . हवाला देऊनच सांगायचे झाले तर पवार कन्या खा. सुळे यांनी देखील नारायण राणे यांना  आदरपूर्वक चिमटा काढला आहे . अगदी त्यांच्याच शब्दात " येवढा अनुभव असताना पक्ष बदलण्याचा निकष काय ? सत्ता जिकडे असेल तिकडे जाणे असा नियम असावा काय ? " सुप्रिया सुळे यांनी अत्यंत महत्वाच्या राजकीय शोकांतिकेवर बोट ठेवले आहे ज्याचे प्रतिनिधित्व नारायण राणे करत आहेत . कडवट संघर्ष अन तीस वर्षे निष्ठा सिद्ध करणाऱ्या नारायण राणे यांनी आपल्या राजकीय सायंकाळी अशी धावपळ अन दगदग करावी राजकारणासाठी दुर्दैवी आहे . जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावरची अन कालची अशोक चव्हाण यांच्यावरची आगपाखड किती समान आहे . २००५ चे बरोबर असणारे राज ठाकरे फक्त काल स्वताच्या तुलनेत अर्धे वाटले . ( माझ्या घरात दोन आमदार आहेत राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकच असल्याचा त्यांचा टोमणा ) याच वेळी त्यांनी स्वताच्या जिल्ह्यात झालेला पराभव अन स्वत हरलेल्या दोन इलेक्शन मात्र ते विसरले . असो मला त्यांच्या पत्रकार परिषदेतील फक्त मुद्दे खोडायचे नाहीत . 
  नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीची भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली आहे . मराठा क्रांती मोर्चापासून त्यांना कमळाचा गंध देऊन भाजपने कॉंग्रेसदूर केलेच होते   काल मुक्त केले . हे करत असताना कुठले राजकीय व्यवस्थापन मात्र जाणीवपूर्वक टाळले आहे . भाजपची कधीकाळी जात काढणाऱ्या कोकणच्या राजाला  फळांचा राजा  बनवून भाजपने कुठला सूड काढला यासाठी वेगळ्या खलाची गरज नाही . 

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king