02 November
तर भाजपचे कल्याणमस्तू
 BJP kalyanamastu
By भागवत तावरे
  • 1231 View

तर भाजपचे कल्याणमस्तू

             राजकारण हा खेळच मुळचा श्यकतेवरचा कारण इथे सारेच ग्रहीत धरून चालावं  लागत म्हणजे इथे इंदिराजींना थेट धूळ पहावी लागते तर गुजराथचे मोदी थेट न्यूयार्क च्या सेंटर मध्ये जाऊन जागतिक आरशात झळकतात . त्याच मोदीच्या व्यक्तिवलयावर देशात भाजपा सत्तेचे भोग भोगत आहे परंतु व्यक्ती वलय हे समाजमनाला खूप काळ केंद्रित करू शकत नाही हे एक सत्य आहे ज्याची सुरवात "कंडोम " च्या निमित्ताने झाली असे म्हणायला हरकत नाही . म्हणजे भाजपच्या "संघाने "सेनेच्या मावळ्याला जशी विधानसभेची पावन " खिंड " दाखवली तसा बाळासाहेबाचा वाघ जमीन खोडून डरकाळ्या फोडत होता , वाट बघत होता सावज गटण्याची तसी अल्पकाळात तयारी करत मित्राचा शत्रू झालेल्या शहागिरी ला अफझल म्हणत मोठाच " प्रताप "केला

.

बर्यापैकी लाटेत सेना टिकल्याचे सर्वांनाच मान्य, सेना पुन्हा जुळवा जुळव करत संधीची वाटच पहात होती कदम , शिंदे , खैरे मिळेल तिथे भाजपचे शरसंधान साधू लागले ,ज्याचा कडेलोट अनेकदा पहायला मिळाला . चवताळलेल्या सेनेला कल्याण  एक संधीच होती ज्यातून सेनेने भाजपला एकेरी , आडवे , तिरपे सगळ्या प्रकारे घेतले . कमालीचा विस्वास असणार्या वाघांनी अखेर मोदीसंघाचा फडशा पाडला . कल्याण-डोंबिवली महापालिकेत राजकीय जुगलबंदी रंगली होती, यात 'तुम्ही आतापर्यंत वाघाची मैत्री बघितली आहे. वाघाचा पंजा अजून पाहिलेला नाही', असा टोला भाजपला लगावला होता, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजतो दात, ही जात आमुची', असं वक्तव्य करून शिवसेनेला आव्हान दिलं होतं.मात्र मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्याने, शिवसेनेच्या वाघाने भाजपला पंजा मारला, मात्र भाजपला वाघाचे दात मोजणे आता दुरापास्त झालं आहे

. राज्यातल्या यशाचे विभाजन विभागून होईल मात्र सरसकट पराभवाचे स्वामित्व भाजपला स्वीकारावे लागेल , बीड मध्ये भाजपच्या पदरी मोठाच "धोंडा" पडला असून ,कोल्हापूर ला कॉन्ग्रेस ने भाजपकडून सासरवाडी हिसकावली आहे ,काँग्रेसने सर्वाधिक 27 जागा पटकावत सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आपला गड राखत काँग्रेसला मोठं यश मिळवून दिलंय. काँग्रेसने आपला मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यासाठी अनुकूल असल्याचे संकेतही दिले आहे. राष्ट्रवादीने मात्र अजून आपला निर्णय जाहीर केला नाही. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी सत्ता स्थापण्यासाठी एकमत होण्याची चिन्ह आहे.राष्ट्रवादीने 15 जागा पटकावल्या तर काँग्रेसने 27 जागा जिंकल्यात. जर आघाडी झाली तर बहुमताचा 41चा आकडा गाठला जाणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना, भाजपला कोल्हापूरकरांनी नापसंती दर्शवत चांगलाच कोल्हापुरी हिसका दिलाय. शिवसेनेला 4 जागा तर भाजपला 12 जागांवर समाधान मानावं लागलंय. ताराराणी पक्षाने 20 जागा जिंकत दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. वाघाच्या जबड्यात घालून हात स्वतःचाच केला घात अशीच हि परिस्थिती आहे अशीच मथळे फेसबुक च्या गल्लीतून फिरत आहेत . शिवसेनचा आवाज अभिनंदनीय यासाठी म्हणावा लागेल कारण मोदीगारुड रोखण्यासाठी पवारासारखे धुरंधर तलवारी म्यान करून बसले होते तेवा सेनेच्या उध्ववाने समशेर उपसली जी धाडसी राजकारणास शोभणारी आहे , बाळासाहेबाचे वारसदार म्हणून ते अपेक्षितच आहे म्हणा परंतु मोदींचा ऐरावत जो झोकात डौलात मुशाफिरी करत होता त्यावरून उद्धव ठाकरेंचे पाऊल मोठेच आव्हान होते . सोबतीला सांगडे सैनिक सोडले तर भाजप सारखी संघ विचारसरणी सेनेकडे नाही तरीही जे सेनेने साधले त्यावरून शिवसेनेचा विस्वास बळावणार हे नक्कीच , रेटेल पण हटणार नाही अश्या ठाकरी बाण्याच्या वाघाला मध्यावधीचे वेध लागले तर नवल काय ?

   शहरात भाजप मागे सरकत असल्याची खबर असताना ग्रामीण भाग ग्रहीत धरून सेना येणाऱ्या काळात दोन हात करू शकेल असेच वाटते . बिहार आणि तिथला निकाल हा येणाऱ्या राजकीय भविष्याला मोठी कलाटणी देयील तेवा धर्म अन गड किल्ल्याचे राजकारण सेनेच्या अंगारापुढे तग धरतील का अशी शंका वाटते . भाजपाने सर्वात मोठे नुकसान तिथे करून घेतले आहे. त्यांनी हिंदूत्वाच्या बाजूने उभी रहाणारी एक फ़ळी दुष्मन करून टाकली आहे. आजवरच्या राजकारणात शिवसेना फ़ार मोठे यश मिळवू शकली नाही. पण तरीही निष्ठेने राबणारा कार्यकर्ता व भावविवश होऊन झुंजणारा तरूण, हे सेनेचे बळ राहिले आहे. त्याला दुखवण्याने दुरावण्याने भाजपाचे झालेले नुकसान कधीच भरून येणारे नाही. मात्र अशा स्थितीत एक वेगळी शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणात उदभवू लागलेली आहे.

  कॉग्रेस वा शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष नव्याने उभारी घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. कॉग्रेसपाशी उभारी देवू शकणारे स्थानिक नेतृत्व नाही; तर राष्ट्रवादीचे बहुतांश नेते खटले चौकशी अशा जंजाळात फ़सलेले आहेत. त्यामुळे विरोधात जोमाने उभे रहाणे त्या दोन्ही पक्षांन शक्य नाही. तीच पोकळी सत्तेत सहभागी असूनही उद्धव ठाकरे भरून काढत आहेत. गुलाम अली वा कुलकर्णी प्रकरणात तर सेनेने भाजपाच्या पाकिस्तान विरोधाचाही बुरखा फ़ाडला. त्यातून त्यांनी अनेक युतीसमर्थक मतदाराला आपल्याकडे ओढले आहे. ही चाल भाजपाला ओळखता आली नाही, तर पुढल्या काळात सत्ताधारी भाजपा विरोधात शिवसेना, असा आखाडा तयार होत जाणार आहे. आजवर अशा बाबतीत कॉग्रेस विरोधात सेना-भाजपा अशी स्थिती होती. आता कॉग्रेस राष्ट्रवादीची भूमिका सरकार म्हणून भाजपाला पार पाडावी लागते आहे. सहाजिकच मुळच्या युतीची पाकविरोधी हिंदूत्ववादी भूमिका एकट्या शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे. त्याचे लाभ त्यांनाच मिळणार यात शंका नाही. पण या गडबडीत कॉग्रेस राष्ट्रवादी यांचे काय? त्यांची मू्ळ मध्यममार्गी भूमिका भाजपा पार पाडत असेल, तर त्यासाठीचा मतदारही भाजपाकडे जाणार ना? म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण पुरोगाम्यांच्या हातून पुर्णपणे निसटून जाण्याचाच धोका नाही काय?

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king