22 November
तर शिवसेना पूर्ण सत्तेत
If the Shiv Sena full power
By भागवत तावरे
  • 4003 View

तर शिवसेना पूर्ण सत्तेत .

संपूर्ण सत्ता हे शिवसेनेचे दिवास्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही त्यासाठीची  सारे देव पाण्यात ठेऊन साधना करत आलेली सेना आणि त्यांचे वाघ गेल्या काही दिवसात त्या स्वप्नाला गवसणी घालण्याची संधी घेण्याच्या बेतात आहेत . भाजपासोबत  चालू असलेला त्यांचा  खेळ कधी भावनिक लाटेत वाहत असतो तर कधी  व्यहारीक नियमाने आपले ' कल्याण ' साधत असतो , एकमेकांचे दात मोजणारे कधी एका बेंचवर बसतात तर कधी खोटे खोटे का होईना एकमेकावर गुरगुर करतात असो आत्ता राजकारण म्हणजे सर्वसामान्य झाले आहे तिथे राजकीय पक्षाचा तर तो धर्मच . असो विषय असा आहे,  गेल्या काही दिवसात सेना भाजपचे वाणयुद्ध कमालीचे टोकावर आहे , बिहार च्या निकालातून भाजपचे अवसान गळाले असेल तर सेनेचा विश्वास निश्चितच वाढला आहे . त्या अनुषंगाने संजयजी ने मोठ्या खुबीने कौड्याफेकनी सुरु केली आहे , दसरा मेळावा ते कालच्या बिहार निकालानंतर शिवसेनेचे डरकाळ्या चढ्या आवाजात कानी पडत आहेत . या वरून राज्याच्या आखाड्यात दोन हात करण्यासाठी सेना तयार असल्याचे निष्पन्न होते मात्र मुद्दा हा आहे कि त्यासाठी जी संधी हवी ती अद्याप धुसुर आहे . कारण मध्यावधीच्या अपेक्षा हा जुगार आहे , दरम्यान साबरमती - बारामती प्रेमकहाणी सेने समोरचा मुख्य पेच आहे .

  शिवसेनेसाठी  राजकीय  डावपेच किमान रेखाटायची नामी संधी आली आहे , ती कशी ते  समजून घेऊ  बारामती मध्ये  हुकुमशाही असल्याची हवाला देणारे मोदी  त्याच बारामतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात   तुज्या गळा माज्या गळा करू लागल्यावर  भाजपच्या त्या मतदारांचा विश्वासघात झाला  जे पवारविरोधी  म्हणून भाजपच्या संघात दाखल झाले होते , तसा परिणाम पवारांच्या पक्षावर होण्याचा काही संबंदच  नाही कारण एक तर ते सत्तेत नाहीत आणि बाकी त्याचा कार्यकर्ता पवारांचा हाडाचा कार्यकर्ता आहे , त्यात १६ ऑक्टो २०१५ रोजी देशाचे  अर्थमंत्री अरुण जेटली येऊन गेले आणि पवारांना नझालेले सर्वोकृस्ट पंतप्रधान म्हणत सूचक विधान करून गेले आता कधीकाळी त्यांच्या मोदींना हुकुमशहा वाटणारे पवार पंतप्रधान म्हणून जर आवडू लागले तर मतदार तेवढा दुधखुळा थोडाच आहे कारण भाजपकडून  झालेली हि घोर फसवणूक ठरावी . कुठ्ल्या एका कार्यक्रमात पवारांच्या मागच्या सीट वर बसणाऱ्या  राज्याचा मोहरख्या भाजपच्या त्या पाठीराख्यांना  कसा सहन होईल ज्यांनी पवारांना मागे सारत  राज्याची सूत्रे फडणवीसी सरकार कडे सुपूर्द केली . राज्य मोठ्या अचंबित होऊन साबरमती बारामती पाहत आहे परंतु जनमत मोठ्या गमतीचे असते ते बोलत नसते ते दाखून देत असते  , याच नसेवर सेनेच्या डरकाळ्या आज राज्याचा  सह्याद्री ऐकत आहे , ज्या पवारांना जेल  दाखवायची भाषा भाजपच्या नेत्यांनी केली होती आज तीच मंडळी  जर बारामतीचा गोडवा आणि अधूनमधून जोगवा मागत असेल तर नक्कीच ज्या नकारात्मक मतावर स्वार होऊन भाजपा सत्तारूढ झाली आहे ते गमावण्याची शक्यता लक्षात घेता शिवसेना त्या मतदारांना पर्याय ठरू शकते कारण अद्याप दोन्ही कॉंग्रेस जनतेत व्विलनच आहेत म्हणून सरकार वर नाराज असणारा एक वर्ग आणि हक्काचा कडवा शिवसैनिक घेऊन शिवसेना ’ वन हेंड ‘सत्ता मिळवू शकेल या बाबद  मातोश्री वर खल चालू शकतील . “ ज्या पवारांच्या राजकारणाला मूठमाती देण्यासाठी आम्ही लढलो त्या पवारांना जर असे वंदन घालून दंडवत दिला जात असेल तर आंम्हाला ती सत्ता नको “ असे म्हणत जर सेना बाहेर पडली तर लोकमानस सेनेसोबत जाऊ शकेल . फक्त पवार गळा भेट नाहीतर सरकार बहुतेक पातळ्यावर येशस्वी ठरलेले नाही म्हणून आज सत्तेत असून देखील एक विरोधक म्हणून शोभून दिसणारे सेनावाले राज्याला पर्याय वाटले तर नवल नको . शिवसेनेचा दुसरा एक पेच तो म्हणजे आपण सत्तेतून बाहेर पडली तरी घरचे लुगडे नेसून पवारांचा पक्ष भाजपला टेकू देऊन पाठिंब्याचे शिंचन घालील ? परंतु सेना जर जेल मध्ये घालण्याची वल्गना करणाऱ्या साबरमती ..बारामती गळाभेटाची टिमकी वाजवत बाहेर पडली तर पवारांना देवेंद्रची आरती आणि भाजप वाल्यांना पवारांना गळ अवघड होऊन बसेल , राज्यातली शेतकर्याची परिस्थिती आणि आत्महत्येच्या किंकाळ्या सरकारच्या माथी आहेत जे भाजपला फेडावे लागेल .  या दरम्यान पवार या वयातही गुगली टाकतात हे जरी विख्यात असले तरी राजकारणात फासे कुणालाच माफ करत नाहीत यावरून पवारांचा नाईलाज करत सेना भाजपला पायउतार करवू शकेल आणि येणाऱ्या आखाड्यात सवता सुभा सत्तारूढ करेल हा युक्तिवाद सयुक्तिक वाटतो. विधान परिषदेच्या आठ जागांची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक काँग्रेस सोबत आघाडी करून लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलेला आहे. या आठ जागांमध्ये चार जागा काँग्रेसकडे सध्या आहेतच. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक, सेना दोन आणि एक अन्य अशा या आठ जागा आहेत. या निवडणुकीचे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्व अशाकरिता आहे की, विधान परिषदेत सत्ताधारी भाजपा-सेनेचे बहुमत नाही. विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीकडे आहे. . अश्या परिस्थिती मध्ये सेनेने बाहेर पडत पवारांना तटस्थ केल्यास यात मोठे राजकारण करण्याची संधी सेनेला आहे . राहिला प्रश्न घटक पक्षाचा दरबारी मनसबदार,  कायम काँग्रेसविरोधी असणार्या भावनेत मेटे ,आठवले , शेटी जोपर्यंत उपवासात आहेत तोपर्यंतचा काळ सेनेच्या पथ्यावरच आहे .  तेही गेल्या काही दिवसापासून  सेना पुढारी मिळेल ती संधी साधत मोदी पासून तर खडसे फडणवीस पर्यंत कुणाचेही वाभाडे काढायला मागेपुढे पहात नाहीत. बिहार निकालाचे आकडे बाहेर पडायच्या आत संजय राउत यांनी आपले स्वप्नरंजण बोलून दाखवले , त्यांना राज्यात बिहार करून दाखवायचा आहे आणि त्यासाठी ते आतुर आहेत . बाळासाहेबाचे राजकारण जवळून पाहिलेला तो जाणता माणूस सेनापतीला कधी शंक फुकायला लावेल सांगता येत नाही ? काही असो राज्यातील राजकारणावर नजर फिरवली तर येणारा काळ विविध घडामोडींचा ठरणार आहे , बिहारचा निकाल हाती येतो न येतो तोच मंत्रिमंडळ विस्ताराचे बिगुल वाजले आणि घटक पक्षाचे आहेर होणार असल्याचे सुतोवाच मिळाले , भाऊबीज संपता संपता भाजपचा संघ पाणी घरात घुसणार नाही यासाठी बांध बन्ध्स्ती ला लागले आहे तरी धुरंधर किती हि प्रभावी असला सत्तेचा कासरा नेहमी जनतेच्या हातात राहिलेला आहे आणि आणि ती ज्यावेळी ठरवते त्यावेळी निकाल स्वीकारावेच लागतात  असे  मानून जनतेच्या मनाचा वेध घेतला तर उद्याचा कल नक्कीच दरबारी राजकारणाच्या विरोधी असेल आणि त्यासाठी सेना पर्याय असेल अन ती नामी संधी असेल सेनेला रुडी प्रतापसिहच्या भाजपचा वचपा काढण्याची , ( रुडी प्रतापानीच  सेना भाजप युती तोडली आणि भरचौकात सेनेला एकटे पाडले ? )   

 

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king