01 November
अहमगंडातल्या गटंगळ्या
ahamagandatalya gatangalya
By भागवत तावरे
  • 1676 View

            मला आजही आठवत आहे मी त्यावेळी राजीव सातव यांच्या नियोजनात  इंदोर ला जितु पत्वारी यांच्या राजकीय विस्लेशनासाठी  गेलो होतो . जाणीवपूर्वक नाव ऐकून असलेल्या एका लोकप्रिय व्येक्तीमत्वाच्या  भेटीचा योग आला . जवळ पास ५० लोक आमच्यासमोर आपआपली सांसारिक राजकीय आणि मानसिक गाऱ्हाणी  घेऊन आलेली होती , समोरची आसामी हसतमुखाने जमलेल्या पीडितांना उपाय सुचवत असे ,भय्यू महाराज .वयाची ४३ वर्षे एखादी व्यक्ती विशिष्ठ धर्म साहितेचा प्रचार आणि प्रसार करते त्यासाठी त्यांना सामाजिक आणि राजकीय पातळीवर मोठा सन्मान लाभतो देशाचे पंतप्रधान ज्याच्या बाजूला बसतात कारण ते एका धर्माचे प्रचारक असताना करते सुधारक आहेत . त्यांच्या सामाजिक कार्यक्रमाचा आलेख अत्यंत अभिनंदनीय आहे . अश्या माणसाने स्थानिक धर्म समेल्नात आपणास बोलावले नाही याचा निषेद करावा येवाना आपण ज्या साहितेचा प्रचार अन प्रसार करत आलो आहोत तिला थेट आव्हान द्यावे ? धर्मत्यागाचे धारीस्त्य दाखवत आपणाकडे पर्याय असल्याचे असल्याचे सांगणे म्हणजे आपण चालवत आलेल्या ऐकून चळवळीचा अपमान समजायचा का ? दत्त संप्रदाय चे प्रचारक भय्यू महाराज यांनी आपण मुस्लिम वा बोद्ध स्वीकारण्याची तयारी दाखवली.यात काही गैर नाही परंतु त्यांनी पुढे केलेले कारण अत्यंत हास्यास्पद आहे . म्हणजे ज्या धर्माचे आपण प्रचारक होता त्या धर्मातील गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात

"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ "

म्हणजे कार्य करत रहा फळाची अपेक्षा करू नको … हीच शिकवण भय्यू महाराजांनी आपल्या साधकांना अनेकदा दिलेली आहे मग आज तेच भय्यू महाराज ज्याप्रमाणे वागण्याची मानसिकता बनवत आहेत त्यावरून " आता मी शहाणा झालो " असेच त्यांना म्हणायचे आहे आणि जर त्यांना असेच म्हणायचे असेल तर ते पूर्वी मूर्ख होते काय ? कारण त्यांना बोद्ध वा इस्लाम स्वीकारताना ज्याचा ते प्रसार करत आले त्या हिंदू सहितेमधील दोष सांगावे लागतील ती सांगताना त्यांनी हे मान्यच केलेलं असेल कि मी या पूर्वी चूक होतो . त्यांनी आपली नाराजी सांगताना एक मोठा विनोद केला आहे ते म्हणतात डॉ बाबासाहेबांनी देखील याच मुळे हिंदू धर्म सोडला मी तद्वतच सोडू शकेल , त्यावरून बौद्ध गुरूंचे खुले आमंत्रण देखील येउन आणि छापून पडली आहेत .

             बाबासाहेब दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत राहिले. सवर्णाच्या मनात कधी तरी अस्पृश्यांबद्दल सद्भावना जागृत होईल या आशेवर ते सतत प्रयत्‍नशील होते. हिंदू धर्मात आपल्याला आदराची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यानी मोठा लढा दिला. आधीच्या पाच वर्षापासून नाशिकच्या़ काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या जिकरीने लढा चालवीत होते. पण पाषाणहृदयी हिंदूना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटत नव्हते. त्याना दलित व अस्पृश्य जनता ही नेहमी कुत्र्यामांजरापेक्षाही खालच्या दर्जाची वाटे. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की बाबासाहेबानी समतेसाठी केलेला झगडा पाच वर्षात मातीला मिळाला. याच दरम्यान जेव्हा नाशिकचा लढा चालू होता तेव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेत गुंतून गेले होते, त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यंकर्त्यांमार्फत हा झगडा सतत पाच वर्षे केला. तिकडे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी मिळेल ते खेचून आणण्याचे काम तर चालूच होते व त्याला चांगले यशही आले. पण नाशिकच्या लढ्यात मात्र सनातनवाद्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी मोठी ताकत लावून लढा दिला. शेवटी या सनात्यन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेब एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतात तो म्हणजे धर्मांतराचा. ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचीही किंमत नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही असा निर्धार करून बाबासाहेब धर्मांतराचा विचार आपल्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवू लागले, त्यांची मने चाचपून पाहू लागले. कार्यकर्त्यांकडून सकारात्म व नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजूने आलेला कल प्रचंड व लक्षणीय होता. आता मात्र बाबासाहेबांना बळ आले. आपल्या समाजातील मोठा जनसमुदाय या हिंदू धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्यावर, बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली. ती म्हणजे पर्यायी धर्म निवडायचा कुठला? जेथे परत जातवादाची पुनरावृत्ती होईल अशा दुसऱ्या धर्मात अजिबात जायचे नव्हते. प्राथमिक पातळीवर बाबासाहेब कार्यकर्त्यांशी संवाद साधून धर्मांतर करण्याच्या निर्णयावर येतात. आता वेळ होती या धर्मांतराच्या घोषणेची. साऱ्या जगाला ओरडून सांगयची की या हिंदूच्या अमानवी वागणुकीला कंटाळून माझा अस्पृश्यवर्ग धर्मांतर करणार आहे हे सांगण्याची. आणि येत्या काही दिवसात येवल्यात भरणाऱ्या परिषदेत ही घोषणा करण्याचे ठरले.[१५] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही घोषणा येथील तत्कालीन समाजव्यवस्थेला दिलेला मोठा धक्का होता. जागतिक पातळीवर या घटनेची नोंद झाली. धर्मसंस्थाने हादरली. परिवर्तनवादी विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या घोषणेचे स्वागत केले. डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तत्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार. परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करूसुद्धा. यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे.

            बाबासाहेबांच्या धर्मपरिवर्तनात आणि भय्यू महाराजाच्या परिवर्तनाच्या घोषणेत कमालीची तफावत आहे बाबासाहेबांनी वयक्तिक मान अपमानातून धर्म सोडला नसून त्यापाठीमागे समाजातील एका मोठ्या वर्गाला समान हक्क न देण्याचा मुद्दा होता त्यामुळे भय्यू महाराजांनी आपणास पर्याय असल्याचे सांगताना आपली तुलना बाबासाहेबाशी करणे म्हणजे अतार्किक आहे . आणि ज्यानुसार त्यांच्या या अपमानाच्या बातम्या छापून आल्या वा आणल्या त्यानुसार त्यांना अहम अह्काराच्या पाशातून निघता आले नाही हेच सिद्ध होते .भय्यू महाराजांचा सामाजिक कार्याचा आलेख मोठा असल्याने त्यांचा जनसामान्यातील आदर भाव मोठा आहे तीच त्यांची अडचण ठरली आणि आपण वैश्विक कीर्तीचे असताना आपण रहात असल्याल्या इंदोर मध्ये आपणास धार्मिक कार्यक्रमास न बोलावण्याचे त्यांना अतीव दुख झाले याशिवाय मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज यांनी आपणास विचारले नाही यासाठी देखील तक्रार केली . गत काळात आपण लोकासाठी एवढे काम केले असून देखील आपला अवमान केल्याचा त्यांचा आरोप आहे यावेळी ते सपशेल पणे एक विसरले आहेत कि ते फक्त दुवा आहेत माध्यम दाता व गरजवंत यांचातले या उपरती अलिशान गाडी जी आपण वापरत आहात त्यासाठी कुठले कष्ट उपसले हा प्रश्न कुणी विचारला तर भाय्युजीना उत्तर देता येणार नाही , भय्यू महारजांना जो राजकीय साधक वर्ग लाभला आहे त्या मागचे कारण हे आता सर्वसामान्य लोकांना कळाले आहे म्हणूनच कि काय भय्यू महाराज म्हणजे " पोलटीकल ब्रोकर " अश्या चर्चा होत आहेत . भाजपची लोकसभेची काही तिकीट भय्यू महाराजाच्या आशीर्वादाने मिळाल्याचे जगजाहीर आहे . एक मैंनजर म्हणून त्यांनी जो योग सरकार आणि जनतेत घडवून आणला त्याबाबाद त्यांचे अभिनदन करता येयील परंतु कालच्या त्यांच्या थयथयाट हा त्याच्या उदारव्रतीला शोभणारा नाही . समाजातील कुठल्या एका धर्माचे ठेकेदार म्हणून मिरवणार्याकडून यापूर्वी कुणाला त्रास झाला नाही का ? तुकोबांना कमी त्रास झाला का ? म्हणून त्यांनी धर्म सोडला नाही म्हणूनच कुठल्या एका कार्यक्रमास न बोलावल्याने भय्यू महाराजांनी टोकाची भूमिका घेणे चुकीचे म्हणावे लागेल कारण संत तुकाराम पुरस्काराबाबाद भय्यू महाराजाचे चिंतन समाजाने ऐकले आहे त्यावरून भय्यू महाराजाच्या कथनित आणि करणीत फरक असावा हे निंदनीय आहे . भय्यू महाराज हिंदू धर्म सोडणार म्हणून हे लिखाण नसून त्यांनी ज्यानुसार त्यांच्या मानसिकतेची मांडणी केली आहे ती कशी न पटणारी अन भंपक आहे या साठीचा हा शब्दप्रपंच . जगातल्या प्रत्येक धर्माची सहिता हि मानवीय आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारी आहे , परस्पर सन्मान करणारी आहे मग हिंदू धर्म त्याग करून कुठल्या एका पर्यायास निवडणे हे पर्यायी धर्मातल्या नितीसुत्राला देखील न जुळणारे ठरेल आणि मग भय्यू महाराज आणि ज्या सन्मानासाठी त्यांची आगपाखड चालू आहे तो ना इथे राहील ना त्यांच्या पर्यायी धर्मात.

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king