31 August

 विवेकाचा शोकांत 

vivekacha shokant
By भागवत तावरे
  • 233 View


हिंदूंचा विवेक मुठभरांच्या तावडीत , चार वेदांचा धर्म चार  महाराजांनी बदनाम केला 
      ११ सप्टेंबर १८९३ शिकागो अमेरिका येथील धर्मसंमेलन , ७००० लोकांनी भरलेले सभागृह , सर्व धर्माचे विद्वान उपस्थित , ४८० शब्दाचे भाषण एका भारतीयाने केले अन त्याने विश्व जिंकले . एका व्यक्तीने आपल्या वक्तृत्व अन कृतत्वाने सनातन धर्माची पताका जगात फडकवली . यासाठी त्यांनी कुठले भक्त मंडळ , संस्था , स्थापन केले नाहीत . फक्त त्याग अन तत्वज्ञान देऊन अवघ्या जगाला हेवा वाटेल अस्या संस्कृतीचे समालोचन करत त्या चीरतरुण माणसाने धर्म जगवला नाही तर जागवला सुद्धा . एकीकडे माज्या बंधू अन भगिनींनो म्हणून स्वामी विवेकानंदांनी उपस्थितांना धर्मपरिचय करून दिला तर दुसरीकडे काही स्वामींनी भगिनींची अब्रू लुटून विवेकानंदाचा धर्म बदनाम केला आहे . हे सनातन धर्माचे अन निस्वार्थ अध्यात्म भाव ठेवणाऱ्या भक्ताचे दुर्दैव आहे . हे कुणाला देखील नाकारता येत नाही . 
हजारो वर्षाची परंपरा असणाऱ्या हिंदू धर्माची वाताहत ५० ते ७० वर्षे वय असणाऱ्या चंगळवाद्यांनी जटा वाढवून केली आहे .कर्मकांडे करत लोकांना श्रध्येच्या नावे अंध करणारे काही लोक आता कामकांडे देखील करू लागली . यातून थेट धर्माची अस्मिता डागाळली जात आहे . जगाच्या पाठीवर असा एक ही धर्म नाही ज्यात मानवाचे अहित आहे . मात्र जेव्हा जेव्हा कट्टरवाद मर्यादा ओलांडतो तेव्हा तेव्हा दहशतवाद समोर येतो ज्याचा निकष कुठला एक धर्म नसतो . शिकागोच्या धर्मपरिषेदेत केलेल्या भाषणाची आम्हाला गरज आहे . परवा बाबा राम रहीम बलात्काराच्या आरोपात दोषी आढळून त्याला शिक्षा झाली . समस्या फक्त एवढी नाही , असे महाराज फोफावतात कसे याचा विचार होणे गरजेचे आहे , तिरपा पाय पडला तर समाज तोंड काढू देत नाही हे वास्तव असताना एकीकडे बाबा राम रहीम सारखे २०० महागड्या गाड्या कशाला घेत आहेत , आयुष्य भगव्या वस्त्रात घालणाऱ्या स्वामी विवेकानंद अन स्वामी परमहंसाच्या वंशात पाश्चात्य कपड्यात धांगडधिंगाणा करणारा कसा काय समाज मान्य करतो . ज्याने बलात्कार अन त्यासाठी खून केले असे आसाराम , राम रहीम या देशात लोकाश्रीत होतात हे धार्मिक शोकांतीका आहे . स्वामी नित्यानंद बंगलोर मध्ये एका अभिनेत्री समवेत २०१० मध्ये असभ्य चित्रफितीत अडकले . नागीण नाच करणारा स्वामी भिमानंद २०१० मध्ये सेक्स राकेट चालवण्यात आरोपी , संत रामपाल देश द्रोहाच्या आरोपात , अन कालचा रामरहीम असे बोटाच्या कांडक्याला न पुरणारे महाराज हजारो वर्षाच्या धर्माला डाग लावण्याचे काम करत आहेत . याच ठिकाणी हा देखील महत्वाचा मुद्दा असा की धर्माचे प्रमुख म्हणून हिंदू धर्मात इतर धर्माच्या तुलनेत कुणी आहेत का नाहीत ? नसतील म्हणूनच हिंदू धर्माचा पसारा नियंत्रनाबाहेर गेला आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तरी हिंदू धर्माचा त्याग कुठल्या मुद्दावर केला होता , याच ना की मानवीय समानता नाकारणाऱ्या रुढीत आपण राहू शकत नाही . गेली ८०० वर्षे ज्या वारकरी संप्रदायकडून धर्माची वस्तूनिष्ठ कीर्तने होत आहेत त्यांच्याकडे पाहायला लोक नाहीत मात्र उत्तर भारताकडील हिमालयातून अवतरीत झालेल्या जटाधारी लोकांचा दिवसा तमाशा मात्र सहन केला जात आहे ही सनातनी शोकांतिका आहे . कारण ४ वेद , १८ पुराण , अन १० उपनिषद असणारा धर्म अश्या काही भामट्यांच्या वासनेच्या पाशात लोकविश्वासाला मुकु लागला आहे , हिंदू धर्मातील साधूवर विनोद अन चुटकुले बनवले जात असतील तर हिंदू धर्मातील जबाबदार लोक , संस्था विचार करतील या माफक अपेक्षेसह आज पहिला अध्याय .

      १८९३ ते २०१७ जैसे थे 
रूचिनां वैचित्र्यात् त्रजुकुटिल नानापथजुषाम्।
नणाम् एको गम्यस्त्वमसि पयसाम् अर्णव इव।।

शोकागोच्या भाषणातील गीतेमधील वरील श्लोक सांगतो " नद्यासम विविध संप्रदाय अंत एक ईश्वराकडे पोहचतात जश्या त्या सागराला पोहचतात . स्वामी विवेकानंद यांनी सर्वधर्म सहिष्णुता १८९३ ला अमिरिकेत बोलून दाखवली जी त्यांना समजली मात्र आम्हाला नाही . प्रत्येक पर स्त्री मध्ये आईला पाहणाऱ्या भारतीय वीर पुत्र विवेकानंद यांचे स्वामी हे बिरूद वापरून वर्तमान महाराज धर्माचा असा व्यापार करतील असे नियतीला तरी वाटले असेल काय ? साम्प्रदायिकता, धर्मान्धता आणी कट्टरता या भिंतीतून बाहेर पडण्याचे आवाहन १८९३ ला जगाला विवेकानंद यांनी केले मात्र आम्ही आज हि डेऱ्यात अडकून त्याला सच्चा समजत आहे . 
         जैन साधू साध्वीच्या नखाची तरी बरोबरी 
जैन धर्मात स्वार्थाचा त्याग करून जो आदर्श स्थापित केला जातो तो कमालीचा उच्य आहे . आयुष्यभर प्रपंच त्याग करून समाजाला तत्वशील , परोपकारी , दयाळू , करुणावंत ,घडवण्यात आयुष्य वेचणाऱ्या जैन साध्वी पाहितल्या तर हिंदू धर्मातील लाखोच्या गर्दीत भजन म्हणत कोटीच्या उलाढाली करणारांची लाज वाटायला पाहिजे . कुठला महाराज लाच घेतलेला कधी काळीचा ग्रामसेवक आहे तर देशातील प्रत्येक जिल्ह्यात हरी ओम मंडळे स्थापन करणारा आसाराम लैंगिक आरोपात तुरुंगात आहे . यामुळे समाजाला आदर्श प्रस्थापित करून दिशा देणारे जर असे वाट चुकणार असतील तर ज्या धर्माचे ते प्रवक्ते आहेत त्या धर्माचे अधिष्ठान सामान्य नजरेत कोसळेल . यामुळे आता हिंदू धर्मातील त्यागाचा आदर्श जैन धर्माकडून घेतला पाहिजे असेच म्हणावे लागेल.

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king