10 September

 सोवळेपुराण

sowlepuran
By भागवत तावरे
  • 325 View


भाऊ कदम ते डॉ खोले, पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका 
परवा दिवसभर सोवळे हा ट्रोल मी संपूर्ण राज्यातून फिरेलेला पाहितला . एखाद्या महिलेला तिच्या काम कौशल्यावरून नाही तर जातीचा निकष लावून तपासणे पुरोगामी महाराष्ट्रात टीका करण्यासारखेच आहे . ७ ऑगस्ट २०१७ रोजी डॉ मेघा विनायक खोले यांनी निर्मला यादव या महिलेने निर्मला कुलकर्णी असे नाव सांगून आपणास फसवले असल्याची तक्रार केली आहे . इथपर्यंत डॉ खोले यांचे बरोबरच आहे नौकरीसाठी दिली जाणारी माहिती खोटी दिली असेल तर ती फसवणूक ठरते मात्र खोले यांनी त्याची परिणामकता जी सांगितली आहे ती मात्र आधुनिक विचाराच्या समाजाला खटकणारी आहे . सदरील महिलेने स्वतला ब्राम्हण सांगून आपले घरात गणपती गौरीचा अन डॉ खोले यांच्या वडिलांच्या श्राद्धाचा स्वयंपाक करून आपल्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . इथे मात्र डॉ खोले यांचे चूकच म्हटले पाहिजे , म्हणजे कुठल्या महिलेची कसौटी जातीवरून करणे चुकीचे कारण महिला काम चांगली करत असावी हे सहा वेळा स्वयपाक केला यावरून सिद्ध होते . डॉ खोले यांनी जातीवरूनचा स्वयंपाक नाकारणे हा जसा टीकेचा विषय आहे त्याच धर्तीवर मी गणपती बसवला मला माफ करा या पुढे मी तसे करणार नाही समाजाच्या भावना दुखावल्या असे म्हणणारा भाऊ कदम देखील डॉ मेघा खोले चा सख्खा भाऊ ठरतो अन मग तेव्हा एकच म्हणावे बाबासाहेब माफ करा जातीअंत तूर्तास शक्य नाही . 
    काल  डॉ खोले यांची सोवळे भंगल्याची फिर्याद वाचली , विज्ञानाची नांदी असणाऱ्या हवामान खात्यात काम करणाऱ्या डॉ मेघा खोले यांच्याकडून अशी फिर्याद होणे हा अटलबिहारी यांच्या जय विज्ञानचा देखील अपमान ठरावा , ब्राम्हण हा गुणाचा असतो जातीचा नाही हा ब्राम्हणी युक्तिवाद देखील खोटी ठरवणारा गुन्हा विज्ञानाच्या आश्रयास निर्वाह करणाऱ्या डॉक्टर ने करावा हि फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी राज्याची शोकांतिकाच ठरावी .  
          जात नाही ती जात,  असे म्हणतात , परवा सोवळ्याच्या नावाने सांस्कृतिक राजधानीत उठलेली आवई खटकनारी आहे मात्र जातीचा बडगा फक्त सावळ्यात नाही तर सर्वत्र फोफावलेला आहे , हे कुणी पाहणार आहे का ? आम्ही मताचे दान देताना जात विसरत नाही , आम्ही सोयरिक करताना जात विसरत नाही , आम्ही आंदोलने , मागण्या करताना आपल्या जातीचा असाच विचार करतो , अधिकाऱ्यातील जात , पुढाऱ्यातील जात अश्या विविध क्षेत्रातील जाती कायम ठेवणारे आम्ही सोवळ्यातल्या जातिवादावर किती सहज तोंडसुख घेतो नाही का ? असो मला खोले बाईचे समर्थन अजिबात करायचे नाही त्यांनी केले ते चूक अगदी निंदा करण्यासारखेच आहे मात्र मला  तेव्हा विषय अधिक अभिनंदनीय वाटला असता जेव्हा निर्मलाताई यांनी आपण ब्राम्हण असल्याचे सांगून नौकरी न मिळवता मी ब्राम्हण नाही म्हणून नौकरी नाकारता का असे म्हणत बंड केले असते . त्यावेळी खोले यांना उत्तर द्यावे लागले असते , मात्र एकीकडे धार्मिक उपासना करण्याचे स्वातंत्र्य जेव्हा घटनेने दिलेले आहे तिथे आम्ही कुणाला त्यांच्या उपासनेवरून किती विरोध करावा ? कुणी आपण उच्य असल्याचा कांगावा करणे हा जसा जातीवाद ठरतो तद्वत आम्ही नीच , त्यांचे अन आपले जमत नाही असा दुराग्रह देखील जातीवाद का समजला जावू नये . कुठल्या धर्माचा वा जातीचा आकस त्यातील कुठल्या असमर्थनीय मुद्द्यावरून करणे हा देखील जातीवाद समजला गेला पाहिजे अन तो करणारे देखील जातीवादी असेच संबोधिले पाहिजेत . समाजातील उतरंड व्यवस्थेमधील ढासळत असताना लोकशाहीतील सोहळ्यात मात्र जातीवरून पक्ष उभे राहतात हे कुणी नाकारणार आहे का ? आमच्याकडे सामुहिक कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा अन वयक्तिक तिसरा कसा असू शकतो . डॉ मेघा या जात पुढे करणाऱ्या एकट्या म्हणून त्यांची निंदा करण्यास विरोध नाही  मात्र भाऊ कदम यांच्यावर सामुहिक बहिष्कार कुठल्या मुद्द्यावर टाकला याचा देखील कुणी विचार करणार आहे का ? तो देखील समाज दुभांगी असेच कर्त्य नाही का , भाऊ कदम यांनी मी गणपती बसवला , या पुढे बसवणार नाही असे म्हणणे देखील कुणाच्या भावना दुखावणारे ठरू शकते . अनेकांना वाटेल की गणपती बसवायचा का नाही हा भाऊ कदमांचा वयक्तिक विषय आहे  , मग डॉ मेघा खोले यांना देखील तोच अधिकार आहे की त्यांच्या घरात नौकरी कुणाला द्यायची अथवा नाही . नौकरी देण्याचे त्यांचे निकष जसे निंदनीय आहेत  तसे भाऊ कदम यांचे देखील कार्य काही खूपच बरोबर असे म्हणण्यासारखे नाही . काही लोकांना भाऊ चे काम बरे वाटू शकते त्यात देखील मूळ जात हेच असेल .
 जात सर्वानीच कायम धरून ठेवली आहे कुणी हक्काच्या नावाने तर कुणी आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी , वरून वरून आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या जयंत्या साजऱ्याकरत आहोत मात्र त्या देखील जातीने वाटून घेऊन त्यामुळे सोवळ्यात आम्ही सर्वच जन आहोत उगाच खोले बाईंच्या नावाने कशाला तक्रारी .........

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king