11 September

मराठ्याचे मोर्चे वांझोटे मात्र वैदिकांची कामना प्रसूत 

marathyanche kranti morche
By भागवत तावरे
  • 1121 View

केंद्राच्या मापात पाप 
भारतात अच्छे दिन नक्कीच आहेत मात्र ते सर्वांसाठी आहेत असे नाही , पाटीला पोट लागलेले मराठे  मोर्चे काढून बेंबीचा देठ सरकारला दाखवत होते .  सरकार मात्र आश्वासनावर मराठ्यांची आश्वासनावर बोळवण करत होते . एक नाही तर तब्बल ५८ मोर्चे काढून मराठ्यांनी विश्वविक्रम केला , मराठ्यांच्या मुकमोर्चाची स्तुतिसुमने सरकार पासून ते जागतिक माध्यमांनी उधळले. वर्षभर रस्त्यावर उतरलेल्या मराठ्यांची ओंजळ मात्र रिकामी राहिली . सरकार न्यायालयाकडे बोट दाखवून सोवळ्यात असल्यागत नामे निराळे राहिले . मात्र आता त्याच भाजपचे सरकार केंद्रात वैदिक ब्राम्हण समाजाला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी चाचपणी करत आहे . सदरील द्विधा दृष्टीकोन मराठ्यांचा दुर्दैवविलास समजला पाहिजे कारण त्यांनी फक्त मम म्हणून संकल्प सोडवून घ्यायचा असाच हा सरकारी चिमटा आहे . 
     ८ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट हा २०१६ ते २०१७  वर्षभर मराठ्यांनी मूकमोर्चे काढून आपला  असंतोष, वेदना अन उणिवांची जाणीव सरकार दरबारी करून आणि पटवून देण्यात कमाल केली . शिस्त अन संयम मराठ्यांची आभूषणे आहेत हेच दिसून आले . मात्र सरकारच्या शेंडीला देखील त्याची जाणीव झाली नाही अन ९ ऑगस्ट ला मुंबईत इतिहास करून मराठ्या स्वखर्चाने घरी परतली . वेदेनेचा असा आक्रोश या पूर्वी भारतात फक्त स्वातंत्र्य संग्रामात दिसून आला असावा . सरकारला मात्र मराठ्यांच्या संयमाचा अन मागणीचा मान पडला नाही . परवा केंद्र सरकारने मात्र भारतातील वैदिक ब्राम्हण समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देण्यासाठी राजकीय पूजा पाठ सुरु  केला अशी माहिती आहे . मात्र त्यांच्या आत्ममग्न हेतूला अल्पसंख्यांक आयोगाने खोडा घातला आहे . वैदिक ब्राम्हण हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्याने त्यांना अल्पसंख्यांकचा दर्जा देता येणार नसल्याचे आयोगाने सांगितले अन हा खेळ समोर आल्याचे बोलले जात आहे . अल्पसंख्यांक समुदायाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी १९९२ ला आयोग स्थापन करण्यात आला . मात्र यात ५६ इंच ढेरी असणारे लोक देखील घुसवण्याची मोदी सरकारची तयारी होती अन त्यासाठी त्यांनी चाचपणी केल्याचे समोर येत आहे . सरकारच्या या धोरणात मात्र रेशीम बागेतले फुले आपला वास सोडत असल्याचे स्पष्ट संकेत यात आहेत . वैदिक ब्राम्हण मध्ये असे किती गरीब असावेत ज्यांना सामाजिक प्रगती द्यावी याची आकडेवारी सरकारला विचारली पाहिजे . नसता मराठ्यांचे कित्येक आकडे ओबीसी मध्ये घेताना सरकारच्या कुठल्या यंत्रणेला पटले असते . अल्पसंख्याक समुदायात मुस्लीम शीख बौद्ध पारशी अन जैन असे धर्म येतात मात्र त्यात हिंदू धर्माच्या उतरंडीत सर्वात वरी असलेल्या विशिष्ट समुदायाला अल्पसंख्याक मध्ये टाकण्याची सरकारची भूमिका का आहे . संघ सरकारवर नियंत्रण करत असावा अन त्यांच्याच सुपीक डोक्यातील वैदिक ब्राम्हणांना सदरील दर्जाचा सीधा योजिला का असे का म्हणू नये . २८ जुलै २०१७ रोजी केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात सदरील प्रस्ताव समोर आला . सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने आयोगाला ब्राम्हण अन सिंधी समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचे सुचवले आहे . सरकारच्या बुद्धीची कीव तर तेव्हा करावी कि सरकारने सिंधी लोकांना अल्पसंख्याक दर्जा हा भाषेचा निकष लावून देण्याची मागणी केली . कारण आयोग अल्पसंख्याक धर्माच्या निकषावर दर्जा देऊ शकतो . सदरील अहवाल समोर आल्याने सरकारचे खायचे दात समोर आले हे नक्की . 

ही तुपाची धार कशाला 
मुख्य प्रवाहात येण्यासाठी मराठा समाजाला आधाराची गरज आहे , यावर कुणाचे दुमत नसताना सरकार त्यासाठी काही करताना दिसत नाही . मात्र भरली पोट असणारा समुदाय मात्र कुठले आंदोलन न करता सरकारच्या नजरेत पडतो काय अन त्यासाठी बेकायदेशीर प्रस्ताव करते काय ? सरकारला मराठ्यांचा दुराग्रह आहे असे म्हटले तर कुणाला राग येण्याचे कारण नाही . अन तो आरोप वर्तमानच नाही तर गेली दोन दशकातील सर्वच सरकार वर असेल . 

 

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king