26 November

पत्रकारांनो जपून लिहा  तुमचा लोया होईल 

patrkarano japun liha
By भागवत तावरे
  • 551 View


रक्तात माखलेल्या हातात सत्तेची सूत्रे ,  जर न्यायधीशाची हत्या तर त्याचा "शहा" कोण ? 
       हेडिंग वाचले ना , वाटलेच  असेल... अरे हा लोया कोण ? असा प्रश्न पडला असेल . कारवान नावाचे साप्ताहिक मधील निरंजन टकले ने एक मोठी बातमी समोर आणत देशात सर्वांना हादरा दिला आहे. .पूर्ण आदराने सांगतो ऐका , जरा काम असेल तर बाजूला ठेवा कारण आजच्या विषयाशी संबंद प्रत्येकाचा आहे . ब्रीजगोपाल लोया नावाचे सिबाआई न्यायलयाचे न्यायधीश यांचा मृत्यू १ डिसेंबर २०१४ रोजी नागपूर मध्ये झाला ज्यावेळी ते एका लग्नासाठी मुंबईवरून गेले होते . आज तीन वर्षे होत असताना  सदरील मृत्यू संशयाच्या फेऱ्यात आलेला आहे. लोया यांच्या बहिणीने उपस्थित केलेले प्रश्न मृत्यूला हत्येच्या दिशेने घेऊन जातात आणि त्यांचे शव ताब्यात घेणारा कथित संघाचा कार्यकर्ता असल्याने आणि लोया यांच्याकडे अमित शहा यांचा मुख्य आरोपी म्हणून असलेला तत्कालीन खटला असल्याने सदरील मृत्यू कुठल्या राजकीय अन यंत्रणेच्या निगराणीत घडवून आणलेली हत्या आहे काय असा प्रश्न समोर येत आहे ? उद्या हा मृत्यू हत्या सिद्ध झाला अन त्यात राजकीय आश्रीत सूत्रधार म्हणून सापडली तर आम्हाला मान्य करावे लागेल कि सत्तेची सूत्रे रक्तांनी माखलेल्या हातात आहेत अन हे पण सांगावे लागेल की लिहणारांनो जपून रहा अनुकूल नसताल तर तुमचा लोया होईल. 
            या देशात कुणावर विश्वास ठेऊन स्वतच्या निर्भीड जगण्याची हमी घ्यावी हा प्रश्न आहे . सत्तेसाठी बापाला तुरुंगात डागनारा औरंगजेब असेल वा मग चुलत्याला मारून दिल्लीचे  तख्त बुडाखाली घेणारा अलाउद्दीन खिल्जी , सत्तेला रक्ताची आहुती लागलेली आहे . आज देखील अनेकांना मिळालेला सत्तेचा परीघ कायम राखण्यासाठी खिल्जीचे वंशज हत्येचे " शहा " बनून लोक मारत आहेत काय ? लोकशाहीत बोलण्याचा अधिकार तर दिलेला आहे मात्र अलीकडच्या काही वर्षात अभिव्यक्तीची गळचेपी , तोंडचेपी आणि गळादाबी होत आहे काय ? सर्वसामान्य लोक वा पत्रकार तर सोडाच मात्र संविधान चालवनाऱ्या न्याय प्रणालीच्या न्यायधीशांची खैर नसल्याची शंका येत आहे . मुंबई येथील सीबीआई चे विशेष न्यायधीश ब्रिजगोपाल हरीकिशन लोया या लातूरचे भूमीपुत्र . सोहराबुद्दिन एन्कौनटर प्रकरण लोया यांच्या समोर चालू होते सदरील प्रकरणात मुख्य आरोपी भाजपचे वर्तमान अध्यक्ष अमित शहा होते . लोया यांनी सदरील प्रकरण त्यांच्यासमोर आले असता अमित शहा कोर्टात का उपस्थित राहत नाही असे विचारात राज्यातील विविध कार्यक्रमात ते उपस्थित असतात मग न्यायलयात का नाही असी टिपणी केल्याचे देखील बोलले जात आहे . ३१ ओक्टो २०१७ रोजी त्यांनी असे विचारले . पुढे १ डिसेंबर २०१४  रोजी द्र्हद्यविकाराचा झटका येऊन त्यांचा नागपूर येथे एका लग्नाच्या निमिताने गेले असता मृत्यू होतो . त्यानंतर एम.जी. गोस्वामी यांची न्यायधीश म्हणून नेमणूक होते . ३० डिसेंबर २०१४  रोजी अमित शहा यांना निर्दोष म्हणून सुनावले जाते . सांगितले गेले कि राजकीय आकसाने त्यांना गोवले आहे . प्रश्न आहेत मात्र ती कोण विचारणार अन कुणाला , इथे उत्तर मिळेल का गोळी याचा नेम नाही ज्याअर्थी लोया यांच्या बहिणीकडून लोया यांची हत्या झाल्याची शंका उपस्थित केली जातेय कुणास ठाऊक यापुढे जो कथित गुन्हेगारांना आव्हान देईल त्याला संपवले जाईल . मारले जाईल ?   अमित शहांचा उल्लेख फक्त यासाठी बातमीत केला आहे कि वाचकांना माहित असले पाहिजे कि न्यायमूर्ती लोया किती मोठ्या खटल्याची सुनावणी करत आहेत . 
हे वाचा 
जेव्हा नागपूर येथील लग्नसमारंभाला आपल्याला जावेच लागेल असे म्हणनारे इतर दोन न्यायधीश जस्टीस लोया यांच्या मृत्यूनंतर दीड महिला कुटुंबाच्या संपर्कात का नव्हते .लोया यांचे शव मुंबईला का नेण्यात आले नाही ते लातूर जिल्ह्यात वडीलाकडे का पाठवले . काही लोकांनी सदरील मृत्यू मध्यरात्री झाल्याचे सांगितले असताना शवविच्छेदन च्या कागदपत्रात ६.१५ ची वेळ दाखवण्यात आली . १०.५५ ते ११.५५ वेळेत शवविच्छेदन करण्यात आले . एका न्यायधीशाचे शव लातूर कडे नेले जात असताना कुठलाही सुरक्षा रक्षक सोबत का नव्हता . ईश्वर बहेती नावाचा आरएसएस कथित कार्यकर्ता सदरील शवाची विल्हेवाट लावण्यासाठी नेमला होता काय ज्याने लोया यांच्या कुटुंबावर न बोलण्यासाठी दबाव वाढवला होता .  बहिण डॉ अनुराधा बियाणी यांनी न्यायमूर्ती लोया यांचा मोबाईल तुरंत मागितला मात्र त्यांना तो तीन दिवसानंतर मिळाला . त्या मोबाईल मध्ये साहब तुम इन लोगो से बचकर रहेना असा संदेश डिलीट केल्याचे बियाणी यांनी म्हटले आहे .निरंजन टाकले नावाचा पत्रकार व कारवान पत्रिकेने केलेल्या खुलास्यावरून न्यायमूर्ती लोया यांना त्यांच्या मृत्यूचे सुतोवाच पूर्वीच मिळाले होते अन ते संघ कार्यकर्ता ईश्वर बहेती यांनी दिल्याचे देखील बोलले जात आहे . डॉक्टर असणारया बहिणीने लोया यांना कुठलाही रोग नव्हता ज्यामुळे त्यांचा झटक्याने मृत्यू होईल. असे सांगितले होते .लातूर येथे भावाच्या अंत्यसंस्कार ला गेलेल्या दुसऱ्या बहिण सरिता मंदाने यांन देखील हाच ईश्वर भेटतो ज्याने लोया यांचा मोबाईल तीन दिवसानंतर बहिनेकडे दिला होता . हत्या का मृत्यू याची चौकशी झाली पाहिजे
. कारण ज्या ठिकाणावरून लोया यांना दवाखान्यात नेले तिथून २ किमी वर रिक्षा स्थानक आहे मग त्यांना नेण्यासाठी रिक्षा कुठून आली ? पत्रकार रडारवर 
मागे मराठी पत्रकार परिषदेने एक निवेदन देऊन सदरील गंभीर बाब समोर आणलेली आहे.पत्रकारांचे मोबाईल ट्रेस केले जात असल्याची तक्रार केलेली आहे . पत्रकार जर यंत्रणाच्या कवेत घेऊन निर्धारित अन बंदिस्त केले जाणार असतील तर हे लोकशाहीला आव्हान ठरेल. पत्रकार हे जनतेचा आवाज मांडणारे दुवे आहेत , माध्यम समाजाचा आरसा म्हणून काम करतात ,सत्तेच्या सोयीचे लिखाण न करणारया लोकांना रडार वर घेताना यंत्रणा वापरल्या जाणार असतील तर यावर देखील प्रश्न निर्माण केला पाहिजे . कुणी उत्तर देईल अथवा नाही कारण जनतेला तरी किमान माहित झाले पाहिजे . 

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king